Share

‘आमच्या सभांमध्ये पाऊस आला की भाजपला धसकाच बसतो!’, धनंजय मुंडेंचा टोला

Published On: 

पंढरपूर : मी कच्च्या गुरूचा चेला नाही, असे राष्ट्रवादीचे दिवंगत आमदार भारत भालके म्हणायचे. मी देखील कच्च्या गुरूचा चेला नाही’ असं म्हणत धनंजय मुंडेंनी भाजपवर निशाणा साधलाय. भारत भालके यांचे पुत्र भगिरथ भालके यांच्या प्रचारासाठी मुंडेंनी वाकडी येथे प्रचारसभा घेतली. यावेळी त्यांनी साताऱ्यातील खा. शरद पवार यांच्या पावसाच्या सभेची आठवण सांगितली. तसेच ‘नुकत्याच झालेल्या जयंत पाटील यांच्या सभेत पाऊस आला आणि विरोधकांनी त्याचा धसकाच घेतला. त्यांना आमच्या सभांमध्ये पाऊस आला की धसकाच बसतो’, अशी टोला मुंडेंनी भाजपला लगावलाय.

भारत भालके यांच्या आकस्मिक निधनाने रिक्त झालेल्या पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक १७ एप्रिल रोजी होणार आहे. या निवडणूकीकरिता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने भगिरथ भालके यांना तर भारतीय जनता पक्षाने समाधान आवताडे यांना उमेदवारी दिली आहे. भगिरथ यांच्या प्रचारासाठी धनंजय मुंडेंनी वाकडी येथे सभा घेतली.

ते म्हणाले, पंढरपूर तालुक्यातील वाकडी येथे सर्व वारकरी दिंड्या विसाव्यास येतात. आज गुढीपाडव्याच्या दिवशी वाकडी येथे प्रचारास येणे हा माझ्यासाठी भाग्यवह योगायोग आहे. ही निवडणूक पक्ष विरुद्ध पक्ष अशी नसून आता सत्य विरुद्ध प्रत्येक गोष्टीत हीण दर्जाचे राजकारण करणाऱ्या प्रवृत्ती अशी आहे. या अपप्रवृत्तींना इथल्या जनतेनेच आता ‘रिंगण’ दाखवावे, असे आवाहन धनंजय मुंडे यांनी उपस्थितांना केले.

राजकीय आरोप-प्रत्यारोपांसह नेत्यांच्या भाषणांमुळे कार्यकर्त्यांचा उत्साह शिगेला गेला असतानाच आज धनंजय मुंडे यांनी प्रचारसभा घेत भाजपवर हल्लाबोल केला आहे. ‘मायच्यान कोणाचाही नाद करा, पण पवार साहेबांचा नाद करु नका’ असा इशाराच त्यांनी विरोधी नेत्यांना दिला आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!