नागपूर – देशात कोरोनाची दुसरी लाट आली आहे. मागील अनेक दिवसांपासून देशात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतेय. या पार्श्वभूमीवर देशातील आरोग्य यंत्रणेवर प्रचंड ताण वाढला असून दुसरीकडे रुग्ण वाढत असल्यामुळे औषधांचा तुटवडासुद्धा जाणवतो आहे. कोरोनावरील उपचारासाठी उपयुक्त ठरणाऱ्या रेमेडेसिव्हीर इंजेक्शनचा तर मोठा तुटवडा भासू लागलाय.
एका बाजूला ही परिस्थिती असताना दुसरीकडे या इंजेक्शनचा काळाबाजार देखील सुरु आहे.यातच आता आणखी एक नागपुरात मुदत उलटून गेलेल्या (एक्स्पायरी डेट) रेमडेसिव्हीर इंजेक्शनची विक्री होत आहे. एक्स्पायरी डेट नमूद केलेल्या जागी नवे स्टिकर चिकटवून रेमडेसिव्हीर इंजेक्शन्स रुग्णांच्या नातेवाईकांना विकली जात आहेत. त्यामुळे नागपुरात मोठी खळबळ उडाली आहे.
ही इंजेक्शन्स अव्वाच्या सव्वा भावाने विकली जात होती. त्यानंतर आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी रेमडेसिव्हीर इंजेक्शन्सचा काळाबाजार करणाऱ्या व्यावसायिकांना कारवाईचा इशारा दिला होता. मात्र, आता एक्स्पायर झालेली रेमडेसिव्हीर इंजेक्शन्स विकून रुग्णांच्या जीवाशी खेळ केला जात आहे. त्यामुळे आता प्रशासन याविरोधात काय कारवाई करणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.
दरम्यान, महाराष्ट्रातील स्थिती पाहता केंद्र सरकारने रेमडेसीवीर इंजेक्शनची निर्यात थांबवण्याचा निर्णय घेतला आहे. रेमडेसीवीर इंजेक्शनची मागणी वाढली असून साठेबाजी करून चढ्या दराने हे इंजेक्शन विकण्याचे प्रमाण हे मोठ्या प्रमाणात वाढलं आहे. राज्यात रुग्णांसाठी रेमडेसीवीर इंजेक्शन मिळवण्यासाठी रुग्णांच्या नातेवाईकांना मोठ्या रांगेत उभे राहून अधिक दराने हे इंजेक्शन विकत घ्यावे लागत आहे.
महत्वाच्या बातम्या
- दलित भिकारी नाहीत तर शिकारी आहेत : रामदास आठवले
- कुंभमेळ्यातील गर्दीवरून संजय राऊतांची प्रतिक्रिया, म्हणाले..
- Breaking : रशियानंतर नंतर अमेरिका, ब्रिटन, जपानच्या लसींच्या वापरालाही भारतात परवानगी
- …म्हणून आशिष शेलार यांनी मानले वर्षा गायकवाड यांचे आभार
- उद्धव काका घरी किराणा पाठवणार आहेत का? डीमार्ट बंद झाल्याने तरुणीचा संतप्त सवाल


