पैठण: दक्षिण काशीतील श्री क्षेत्र पैठण येथील तीर्थ स्तंभ उद्यानात दरवर्षीप्रमाणे याही वर्षी गुढी उभारत पारंपरिक प्रथा परंपरा जपण्यात आल्या. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मोजक्याच शालीवाहन भक्तांच्या उपस्थित हा कार्यक्रम करण्यात आला. जुन्या पैठण मधील शालीवाहन नगरीतील सम्राट शालीवाहन राजाने दक्षिण भारतावर विजय मिळविल्यानंतर विजयाच्या प्रित्यर्थ दगडी तीर्थ स्तंभ उभा केला असे ठाम मत इतिहास संशोधकांनी व्यक्त केले आहे. त्यामुळे या तीर्थ स्तंभ उद्यानात माजी नगराध्यक्ष शेखर पाटील यांच्या हस्ते गुढी उभारण्यात आली.
इतिहास प्रेमी मंडळींनी यावेळी महाराष्ट्र शासनाने सम्राट शालीवाहन व पैठणचे भुमिपुत्र इतिहास संशोधक बाळासाहेब पाटील यांचे भव्यदिव्य स्मारक उभे करावे, तसेच जगातील एकमेव दुर्मिळ तीर्थ स्तंभ असल्यामुळे या तीर्थ स्तंभास राष्ट्रीय स्मारक घोषित करावे अशा मागण्या पैठण शहरातील इतिहास प्रेमींनी शासनाकडे केल्या आहेत. राज्य शासनाच्या मराठवाडा पुरातत्व विभागाकडुन भरीव कारवाई केली जात नसल्यामुळे इतिहास प्रेमी नागरिकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. सध्या रोहयो तथा फलोत्पादन मंत्री संदिपान भुमरे यांच्या पुढाकाराने तीर्थ स्तंभाचा विकास होतांना दिसत आहे.
हा उत्सव यशस्वी करण्यासाठी आयुधसिग पाटील, शंभु रूपेकर आदींनी विशेष परिश्रम घेतले. पैठण येथील गुढीपाडव्याचे आगळेवेगळे महत्त्व असल्यामुळे गीतामंदीरात तथा शहरातील घराघरांमधुन आनंददायी आयुष्याचा संकल्प करीत हा उत्सव साध्या पध्दतीने साजरा करण्यात आला. यावेळी उत्सव समितीचे सागर पाटील, रमेश खांडेकर, दिनेश पारीख, साहित्यिक व संशोधक जयवंत पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
महत्त्वाच्या बातम्या
- महाविकास आघाडीच्या ‘त्या’ निर्णयाचं चित्रा वाघ यांनी केलं स्वागत !
- प्रचारसभांवर तत्काळ बंदी आणा, सोनिया गांधींची पंतप्रधान मोदींकडे मागणी
- ममता बॅनर्जींनी केले गांधीजींच्या मूर्तीसमोर चित्रे काढत धरणे आंदोलन
- …म्हणून आशिष शेलार यांनी मानले वर्षा गायकवाड यांचे आभार
- कोरोना रुग्णांच्या उपचारात हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नाही: संदीपान भुमरे
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

