Share

नोबेल पुरस्काराप्रमाणे टागोर यांच्या नावानेही पुरस्कार सुरू करणार – अमित शाह

Published On: 

कोलकाता : नोबेल पुरस्काराच्या धर्तीवर टागोर पुरस्कार सुरू करून जगभरातील कला, विज्ञान आणि साहित्य क्षेत्रात कार्य करणाऱ्यांना बंगाल सरकारच्या वतीने सन्मानित करण्यात येईल, असे आश्वासन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी दिले आहे. पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी ते सध्या पश्चिम बंगालच्या दौऱ्यावर आहेत या दरम्यान ते बोलत होते.

पश्चिम बंगालमधील निधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी भारतीय जनता पक्षाच्या वतीने जोरदार प्रयत्न सुरू आहे. त्यात विद्यमान मुख्यमंत्री ममता बॅनर्जी देखील भाजपला चांगलीच टक्कर देत आहेत. त्यामुळे सध्या बंगगालमध्ये आरोप-प्रत्यारोप ऐकायला मिळत आहे. त्यातच अमित शाह यांनी दिलेले हे आश्वासन मतदारांच्या किती पचणी पडेल हे सांगता येणार नाही.

रविंद्रनाथ टागोर हे नोबेल पुरस्कार मिळवणारे पहिले भारतीय तसेच पहिले आशियाई व्यक्ती देखील होते. त्यांनी वयाच्या ८ व्या वर्षी पहिली कविता लिहिली होती. भारतीय साहित्य क्षेत्रात त्यांचे योगदान खुप मोठे आहे. त्यांच्या नावाने हा पुरस्कार जाहीर झाल्यास अनेकांना आनंद होणार आहे. मात्र, पश्चम बंगाल निवडणुकीत त्याचा किती पारिणाम होतो, ते निकालानंतरच स्पष्ट होईल.

महत्त्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!