मुंबई : ढाई किलो का हाथ..या डायलॉगमुळे अधिक प्रसिध्द असलेला अभिनेता सनी देओल. दसऱ्याच्या शुभ मूहुर्तावर चाहत्यांना एक आनंदाची बातमी दिली असून मोठ्या पडद्यावर पुन्हा एकदा दमदार त्याची एण्ट्री करणार आहे.
२००१ सालामध्ये आलेल्या ‘गदर- एक प्रेम कथा’ या सकिना आणि तारा सिंहची लव्हस्टोरी प्रेक्षकांच्या पसंतीस पडली होती. या सिनेमाचा सिक्वल कधी पाहायला मिळणार असे प्रेक्षकांना वाटायचे. अखेर प्रदीर्घ काळानंतर म्हणजेच दोन दशकांनंतर सनी देओलचा सिनेमाचा म्हणजेच ‘गदर’चा सिक्वल घेऊन येत असल्याची घोषणा सनीने केलीय.
दरम्यान ‘गदर’ सिनेमाचा सिक्वल येणार अशी चर्चा रंगली होती. तर या सिनेमाच्या स्क्रिप्टवर काम सुरु असल्याचे संकेतही दिग्दर्शक अनिल शर्मा यांनी दिले होते. मात्र अखेर आज या सिनेमाची अधिकृतरित्या घोषणा करण्यात आली आहे. विशेष म्हणजे या सिक्वलमध्ये देखील सनी देओल आणि अमिषा पटेल झळकणार आहेत. सनी देओलने सोशल मीडियावर या सिनेमाचं मोशन पोस्टर शेअर केलंय. यात कॅप्शनमध्ये लिहिलंय ‘दोन दशकांनंतर अखेर प्रतीक्षा संपली! दसऱ्याच्या शुभदिनी, तुमच्यासाठी सादर करत आहोत गदर-२ चं मोशन पोस्टर’ या पोस्टनंतर सनी देओलच्या चाहत्यांनी आनंदं व्यक्त केलाय. तर ट्वीटरवर देखील सनी देओलने ‘पुढील कहाणी’ असं ट्वीट केल्याने चाहत्यांमध्ये उत्साह पाहायला मिळाला.
महत्त्वाच्या बातम्या
- कोरोना नियमांचे उल्लंघन करणाऱ्या रोहित पवारांवर प्रशासन कारवाई करण्याची हिम्मत दाखवणार ?
- विना परवानगी मिरवणूक प्रकरणी वसमतमध्ये आमदार, खासदारांसह पाचशे शिवप्रेमींवर गुन्हा दाखल
- सणाच्या दिवशी आर्यनकडून आई-वडीलांना तुरुंगातून व्हिडीओ कॉल!
- ‘जर कोणी तिच्या पतीचा, कुटुंबाचा अपमान..’रवीनाने दिली होती ताकीद..!
- तुम्ही उन्हात, आम्ही सावलीत हे आम्हाला पटत नाही – प्रीतम मुंडे
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

