Share

कोरोना नियमांचे उल्लंघन करणाऱ्या रोहित पवारांवर प्रशासन कारवाई करण्याची हिम्मत दाखवणार ?

Published On: 

अहमदनगर – कोरोनाची दुसरी लाट हळूहळू ओसरताना दिसत आहे. अनेक ठिकाणी नागरिक गर्दी करताना दिसत आहेत. या गर्दी करणाऱ्या नागरिकांवर प्रशासनाकडून कारवाई देखील करण्यात येत आहे. काही जाणकार तर तिसऱ्या लाटेची देखील शक्यता वर्तवत आहेत. या पार्श्वभूमीवर केवळ नागरिकांनीच नव्हे तर राज्यकर्त्यांनी देखील गर्दी करण्याचं टाळायला पाहिजे मात्र तसे होताना दिसत नसल्याचे चित्र आहे.

आज रोहित पवार यांनी विजयादशमीच्या मुहूर्तावर अहमदनगरच्या खर्डा येथील ऐतिहासिक शिवपट्टण किल्ल्यासमोर ‘स्वराज्य ध्वजाची’ स्थापना केली आहे. हा देशातील सर्वांत उंच भगवा ध्वज असल्याचा दावा त्यांच्याकडून केला जात आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार सर्वांपर्यंत पोहोचावा या संकल्पनेतून रोहित पवार यांनी या ध्वजाची स्थापना केल्याचं सांगितलं जातं आहे.मात्र या कार्यक्रमाला मोठ्याप्रमाणात गर्दी झाल्याचे दिसून आले आहे.

संभाव्य तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर राज्य शासन सामान्य लोकांना कोरोना नियमांचे पालन करण्याचे आवाहन करत असताना दुसऱ्या बाजूला सत्ताधारी नेतेच अशापद्धतीने गर्दी जमवताना दिसून येत आहेत. आज झालेल्या रोहित पवार यांच्या कार्यक्रमाला अनेक दिग्गज नेत्यांनी हजेरी लावली मात्र ना नेत्यांनी कोरोनाचे नियम पाळले ना कार्यकर्त्यांनी. त्यामुळे आता सर्वसामान्य जनतेवर कोरोना नियमांचे उल्लंघन केल्याने कारवाई करणारे प्रशासन आता रोहित पवार यांच्यासह आयोजकांवर नेमकी काय कारवाई करणार हे पाहणे महत्वाचे आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!