मुंबई : अभिनेत्री रवीना टंडन ही केवळ अभिनेत्री म्हणूनच नव्हे तर तिच्या बेधडक वक्तव्यासाठी देखील ओळखली जाते. ती सोशल मीडिया पोस्टद्वारे सामाजिक विषयांवर बिनधास्तपणे मत मांडताना देखील ओळखली जाते.
तिने ‘पत्थर के फूल’ या चित्रपटातून करिअरला सुरुवात केली. यानंतर एकाहून सुपरहिट सिनेमे तिच्या नावे आहेत. मात्र तिच्या वैयक्तिक आयुष्यात देखील ती खूप लक्ष देते याबद्दल तिने एका मुलाखतीत उल्लेख ही केला आहे.
दरम्यान चित्रपटांमध्ये काम करत असताना रवीनाची ओळख उद्योगपती अनिल थडानीशी झाली. हळूहळू त्यांच्या भेटी वाढू लागल्या. त्यानंतर अनिलने रवीनाला लग्नासाठी विचारले होते. रवीनाने होकार देताच ते लग्न बंधनात अडकले. रवीना ही अनिलची दुसरी पत्नी. त्याच्या पहिल्या पत्नीचे नाव नताशा होते.
एकदा चित्रपट निर्मार्ता रितेश सिधवानीच्या न्यू इअर पार्टीला रवीनाला बोलवण्यात आले होते. या पार्टीला अनिलची पहिली पत्नी नताशा देखील हजर होती. या पार्टीमध्ये नताशा अनिलशी बोलण्याचा प्रयत्न करीत होते. ते पाहून रवीनाला संतापली आणि तिच्या हातात असलेल्या ग्लासातील सरबत तिने नाताशाच्या चेहऱ्यावर फेकले. रवीनाचे कृत्य पाहून सर्वांनाच धक्का बसला होता. या विषयी रवीनाला एका मुलाखतीमध्ये विचारण्यात आले होते. ‘जर कोणी तिच्या पतीचा किंवा कुटुंबाचा अपमान करेल तर ती त्याला सोडणार नाही’ असे रवीना म्हणाली होती. तिच्या अभिनय क्षेत्रासह तिचं बेधडक वागणं देखील तितकचं प्रसिध्द आहे हे नक्की.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘महाविकास आघाडीत शिवसेनेसारखा हिंदुत्वाचा पाठीराखा पक्ष सामील झाल्याने भाजपचा बुरखाच फाटला’
- खरकटं उष्ट खाणाऱ्या, निर्लज्ज लोकांचा देश म्हणजे हिंदुस्थान; संभाजी भिडेंचं पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य
- मुख्यमंत्री पातळीवर रात्रीतून मोठ्या हालचाली, शिवसेनेच्या दसरा मेळाव्यातील अडथळे केले दूर
- किरीट सोमय्यांनी घेतली करमुसेंची भेट, आव्हाडांच्या अडचणी आणखी वाढण्याची शक्यता
- महाविकासआघाडी सरकारने शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसली – स्वाभिमानी
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

