हिंगोली : जिल्ह्यातील वसमत येथे मागच्या अनेक वर्षांपासून छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा व्हावा अशी शिवप्रेमींची मागणी होती. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज पुतळा समिती गठीत करून समितीच्या माध्यमातून लोकवर्गणीतुन महाराजांचा पंचधातून बनविलेला अश्वारूढ १४ फूट उंचीचा पुतळा जयपूर येथील कारागिरांकडून बनवून घेतला आहे. शिवरायांचा पुतळा वसमत येथे दाखल झाला असता शिवप्रेमींच्या वतीने महाराजांचे ढोल ताशे डीजे लावून जंगी स्वागत करीत मिरवणूक काढण्यात आली होती.
या मिरवणूकीला गर्दी जमवित विना परवानगी मिरवणूक काढल्याने वसमत पोलीस ठाण्यात आमदार, खासदारांसह पाचशे शिवप्रेमींवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. या मिरवणुकीला पोलिसांकडून परवानगी नाकारण्यात आली होती. पण छत्रपती शिवाजी महाराज पुतळा समिती आणि लोकप्रतिनिधींनी यावेळी पोलिसांच्या नोटिसांना न जुमानता गर्दी जमवित कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे उल्लंघन केले होते.
यावरून १४ ऑक्टोबर गुरुवार रोजी उशिरा छत्रपती शिवाजी महाराज समितीचे सर्व सदस्य, तसेच समितीचे अध्यक्ष खासदार हेमंत पाटील, आमदार राजू नवघरे, शिवसेनेचे माजी मंत्री डॉ जयप्रकाश मुंदडा, सर्व पक्षाचे उपस्थित स्थानिक पदाधिकाऱ्यांसह पाचशे शिवप्रेमींवर वसमत शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. साथ रोग प्रतिबंध कायदा १८९७ कलम २ तसेच जिल्हाधिकारी यांचा आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५, गर्दी जमविल्या प्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘महाविकास आघाडीत शिवसेनेसारखा हिंदुत्वाचा पाठीराखा पक्ष सामील झाल्याने भाजपचा बुरखाच फाटला’
- खरकटं उष्ट खाणाऱ्या, निर्लज्ज लोकांचा देश म्हणजे हिंदुस्थान; संभाजी भिडेंचं पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य
- मुख्यमंत्री पातळीवर रात्रीतून मोठ्या हालचाली, शिवसेनेच्या दसरा मेळाव्यातील अडथळे केले दूर
- किरीट सोमय्यांनी घेतली करमुसेंची भेट, आव्हाडांच्या अडचणी आणखी वाढण्याची शक्यता
- महाविकासआघाडी सरकारने शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसली – स्वाभिमानी
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

