Share

सणाच्या दिवशी आर्यनकडून आई-वडीलांना तुरुंगातून व्हिडीओ कॉल!

Published On: 

मुंबई : क्रूझ रेव्ह ड्रग्ज पार्टी प्रकरणात न्यायालयीन कोठडीत असलेल्या आर्यन खान तसेच इतरांच्या जामीन अर्जावरील सुनावणी पूर्ण झाली आहे. मात्र न्यायालयाने आर्यन खानच्या जामीन अर्जावरील आपला निकाल राखून ठेवला आहे. येत्या 20 ऑक्टोबरला न्यायालय आपला निकाल देईल. दरम्यान, सुनावणी पूर्ण झालेली असली तरी आर्यन खानचा मुक्काम सध्यातरी तुरुंगातच असणार आहे.

दरम्यान, दसऱ्यानिमित्त आर्यनने आर्थर रोड कारागृहातून आई गौरी आणि वडील शाहरुख खानशी व्हिडीओ कॉलद्वारे संवाद साधला. आर्यनने दहा मिनिटं आई-वडिलांशी गप्पा मारल्या. सणासुदीच्या काळात कारागृहात कैद्यांना त्यांच्या कुटुंबीयांना भेटण्यासाठी वेळ दिला जातो. मात्र कोविडच्या पार्श्वभूमीवर कुटुंबीयांना

भेटणं शक्य नसल्यामुळे कारागृह प्रशासनाने व्हिडीओ कॉलिंगची व्यवस्था केली आहे. कारागृहातील अंदाजे एकूण ३२०० कैद्यांना टप्याटप्याने १० मिनिटांसाठी व्हिडीओ कॉलद्वारे कुटुंबीयांशी बोलण्याची संधी दिली जाते. सध्या आर्थर रोड कारागृहात व्हिडीओ कॉलिंगसाठी ११ स्मार्टफोन हँडसेट आहेत.

‘आर्यनने व्हिडीओ कॉलिंगसाठी आईचा नंबर दिला. आई आणि वडिलांसोबत तो जवळपास १० मिनिटे बोलला’, अशी माहिती वरिष्ठ तुरुंग अधिकाऱ्याने दिली. कारागृहाच्या नियमांनुसार, गुन्हा सिद्ध न झालेले आरोपी हे महिन्यातून दोन किंवा तीन वेळा कारागृहातील पोलीस कॉन्स्टेबलच्या उपस्थितीत त्यांच्या कुटुंबीयांशी किंवा वकिलाशी संवाद साधू शकतात.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!