Share

तुम्ही उन्हात, आम्ही सावलीत हे आम्हाला पटत नाही – प्रीतम मुंडे

Published On: 

बीड : गोपीनाथ गडावर मुंडे साहेबांचे आशीर्वाद घेऊन निघाले तेव्हा त्यांना एकच मागणं मागितलं की आज समाजात जी नकारात्मका पसरली आहे, तीचा सामना करण्याची शक्ती द्या, आज तुमचा उत्साह पाहून माझा तो विश्वास आणखी दृढ झाला आहे. असे प्रतिपादन खासदार प्रतीम मुंडे यांनी दसरा मेळाव्यात उपस्थित जनसमुदायास केले. यावेळी गडावर प्रचंड गर्दी झाली होती.

पुढे बोलताना प्रीतम मुंडे म्हणाल्या, तुम्ही उन्हात असताना आम्ही सावलीत बसणं हे आम्हाला पटत नाही. त्यामुळे उन्हात, अतिवृष्टीत आणि कोरोनात आम्ही तुमच्यासोबत आहोत. तुमच्या प्रत्येक सुखदुखात आम्ही तुमच्यासोबत राहू. आपलं हे नातं असंच राहो अशी इच्छा व्यक्त करते. मुंडे कुटुंबात जन्मल्याचं भाग्य मिळालं त्यामुळे आम्ही भाग्यवान आहोत.

एव्हढे उन असताना गर्दी उन्हात कशी थांबली, असा प्रश्न मला विचारण्यात आला. या चमत्काराचं कारण विचारलं गेले. त्यावर मी म्हटलं तुम्ही मुंडे कुटुंबात जन्माला आले असता तर तुम्हाला कळलं असतं. मुंडे कुटुंबात जन्मल्याचं भाग्य मिळालं त्यामुळे आम्ही भाग्यवान आहोत.

राजकारणात अनेक लोक संपत्ती कमावतात, काही लोक बेनामीही संपत्ती जमवतात. पण मुंडे साहेबांनी आम्हालाही संपत्ती दिली, ती संपत्ती तुमच्यारुपाने समोर आहे. ही गर्दी हा समाज हीच आमची संपत्ती आहे.

पुढे बोलताना प्रीतम मुंडे म्हणाल्या, आपला आवाज दिल्ली, मुंबईपर्यंत पोहोचेल. मेळावा होईल की नाही हा संभ्रम होता, ज्या लोकांच्या मनात शंका होती त्यांना मला सांगायचं आहे की हा जनसमुदाय पाहा. गोपीनाथ मुंडे म्हणजे पंकजा मुंडे प्रीतम मुंडे नाही तर आज महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेले तुम्ही सगळे आमच्या कुटुंबाचा भाग आहात.

आपला मेळावा हा पक्षाचा किंवा राजकीय मेळावा नाही तर हा मेळावा त्या प्रत्येक वंचितासाठी आहे ज्याचं हातावरच पोट आहे, ज्याची समाजातून काहीतरी अपेक्षा आहे. ज्याला ही अपेक्षा आहे की या विकासाच्या गंगेत आपला नंबर कधीतरी येईल. इथे येऊन तुम्ही ऊर्जा घेता. संघर्ष करण्याची प्रेरणा मिळवण्यासाठी तुम्ही येथे येता. हेच आपल्या मेळाव्याचं महत्व आहे. हा भगवानबाबच्या भक्तीचा आणि मुंडे साहेबांवरील श्रद्धेचा हा मेळावा आहे. असेही यावेळी प्रीतम मुंडे म्हणाल्या.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!