शिर्डी : देशात हुकूमशाही व एकाधिकारशाही वाढवणाऱ्या भाजप सरकारने सातत्याने केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर सुरु केला आहे. नॅशनल हेरॉल्ड प्रकरणी काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी व खासदार राहुल गांधी यांना आलेली ईडीची नोटीस ही लोकशाहीची चिंता वाढवणारी आहे. संपूर्ण देशातील जनता व काँग्रेसजन सोनिया गांधी यांच्या पाठीशी आहेत, असे विधिमंडळ पक्षनेते व राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात म्हटले आहे. शिर्डी येथे आयोजित काँग्रेसच्या नवसंकल्प शिबिरात ते पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, प्रवक्ते अतुल लोंढे, डॉ. सचिन सावंत, आशिष दुवा उपस्थित होते.
याप्रसंगी बोलताना थोरात म्हणाले की ,भाजपकडून केंद्रीय यंत्रणांचा सातत्याने गैरवापर करून विरोधकांना दडपण्याचे काम करत आहे. त्याचप्रमाणे देशात जातीय व धार्मिक तेढ निर्माण करून लोकशाहीवर आघात त्यांनी सुरू केला आहे. हे देशाच्या दृष्टीने योग्य नाही. संपूर्ण देशातील जनता आणि काँग्रेसजन हे सोनिया गांधी यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी असून, भाजपच्या या चुकीच्या दडपशाहीमुळे देशातील जनतेमध्ये प्रचंड रोष व असंतोष निर्माण झाले असल्याचेही थोरात यांनी म्हटले आहे .
या पत्रकार परिषदेत पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, उदयपूर संकल्प शिबिरातील अर्थकारणाच्या गटातून मोदी सरकारच्या सध्याच्या धोरणांवर तीव्र विरोध करण्यात आला आहे. सार्वजनिक कंपन्यांच्या काही भांडवलदारांना कवडीमोल किंमतीत विक्री, राज्यांच्या अधिकारावर गदा, या मुद्दें बरोबर भविष्यातील आधुनिक तंत्रज्ञान चे मनुष्यबळ तयार करावे लागणार आहेत. 1990 चे आर्थिक बदलानंतर य टेलिकॉम व पेट्रोल या क्षेत्रातील सत्ता काही उद्योजकांच्या हाती गेली आहे .महागाईमुळे देशात महामंदी येईल अशी भीतीही त्यांनी व्यक्त केली असून राज्य केंद्राकडून राज्याला कायम सापत्न वागणूक दिली जात असल्याचे ही ते म्हणाले.
महत्त्वाच्या बातम्या :
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

