Share

‘सोनिया गांधी याच आमच्या नेत्या’ ; UPA अध्यक्षपदावरून महाविकास आघाडीत वाद

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : संयुक्त पुरोगामी आघाडी (यूपीए) च्या नेतृत्वाचा मुद्दा सध्या देशातील राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय झाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचं नाव या पदासाठी चर्चेत आहे. शरद पवार यांचे नाव यूपीएच्या अध्यक्ष पदावर यावे, असे शिवसेनेचे मत असले तरी कॉंग्रेस पक्ष ते अजिबात मान्य करण्यास तयार नाही आहे.

या सर्व प्रकरणात शिवसेनचे नेते आणि राज्यसभा खासदार संजय राऊत व कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यामध्ये चांगलीच शाब्दिक चकमक गेले अनेक दिवस आपल्याला दिसत आहे.

या सुरु असलेल्या शाब्दिक वादावादीत आता काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे यांनीही उडी घेतली आहे. शरद पवार यांच्याबद्दल आम्हाला आदर आहे. पण सोनिय गांधी याच आमच्या नेत्या असल्याचे प्रणिती यांनी स्पष्ट केले.

त्या शनिवारी सोलापुरात प्रसारमाध्यमांशी बोलत होत्या. यावेळी त्यांनी UPA अध्यक्षपदाच्या वादाविषयी आपली भूमिका स्पष्ट केली. यूपीएच्या अध्यक्षपदाबाबत संजय राऊत यांनी केलेले वक्तव्य त्यांचे वैयक्तिक मत आहे. शरद पवार यांच्याविषयी आम्हाला प्रचंड आदर आहे.

महाविकास आघाडी एकत्र येण्यामध्ये देखील पवार साहेबांचे योगदान मोठे आहे. मात्र सोनिया गांधी या यूपीएच्या चेअरमन आहेत आणि त्याच आमच्या नेत्या असल्याचे प्रणिती शिंदे यांनी सांगितले.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!