गांधीनगर : पाटीदार समाजाचा युवा नेता आणि पाटीदार समाजाच्या आरक्षणासाठी लढणाऱ्या हार्दिक पटेल यांनी काँग्रेस सोडल्यानंतर आज अखेर त्यांचा भाजप मध्ये जाहीर प्रवेश झाला. गुजरातच्या राजधानीच्या शहरात हार्दिक पटेल यांच्या पक्ष प्रवेशाचा कार्यक्रमी पार पडला. गुजरातसह देशभरात मोठा चाहता आणि समर्थक हार्दिक पटेल यांना आहे.
हार्दिक पटेल यांनी १८ मे ला काँग्रेसचा राजीनामा दिला होता. काँग्रेसला सोडताना त्यांनी पक्षावर गंभीर आरोप केले होते. पक्षनेतृत्वावर सडकून टीका केली. पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वावर आक्षेप नोंदवले होते. हवं ते काम करण्याची संधी मिळत नसल्यानं काँग्रेसला सोडण्याचा निर्णय हार्दिक यांनी घेतला होता. शिवाय तशी संधी भाजपमध्ये मिळेल, अशी आशा असल्याने त्यांनी भाजपचं कमळ आपल्या ‘हाती’ घेतलं आहे.
LIVE: પ્રદેશ અધ્યક્ષ શ્રી @CRPaatil ની અધ્યક્ષતામાં કોંગ્રેસના નેતા શ્રી હાર્દિકભાઈ પટેલનું ભારતીય જનતા પાર્ટીમાં સ્વાગત | સ્થળ: પ્રદેશ કાર્યાલય 'શ્રી કમલમ્' https://t.co/Iu7o03oxgv
— BJP Gujarat (@BJP4Gujarat) June 2, 2022
हार्दिक यांना काँग्रमध्ये काम करण्याची संधी मिळत नव्हती. तर आता दुसरीकडे भाजमध्ये त्यांचं जोरदार स्वागत केलं जात आहे. भाजप हार्दिक यांची ताकद माहिती आहे. हार्दिक यांच्या पाठिशी असलेला मोठा तरूणवर्ग आणि पाटीदार समाज यामुळे निवडणुकीत हार्दिक हा निर्णायक मोहरा आहे. म्हणूनच भूतकाळात हार्दिक पटेल यांनी केलेल्या भाजपवरील टीका विसरून निवडणुकीच्या तोंडावर भाजप त्यांना संधी देत आहे.
महत्त्वाच्या बातम्या :


