नवी दिल्ली: कालच अंमलबजावणी संचलनालाय म्हणजेच ईडीकडून मोठी कारवाई करण्यात आली. नॅशनल हेराल्ड प्रकरणी ईडीने सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांना समन्स बजावले आहे. सोनिया गांधी यांना ८ जून रोजी चौकशीसाठी बोलावण्यात आले आहे. यानंतर काँग्रेसकडून तीव्र संतापाच्या प्रतिक्रिया उमटत असतानाच भाजप नेते गौरव भाटीया यांनी मोठा खुलासा केला आहे.
केवळ भारतातच नाही तर संपूर्ण जगात सर्वात जास्त भ्रष्ट कुटुंब असेल तर ते गांधी कुटुंब आहे.कारण सोनिया गांधी या एकाच कुटुंबातील तीन सदस्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप असून त्या जामिनावर बाहेर आहेत. राहुल गांधी यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप असून ते जामिनावर आहेत. तर जमीन घोटाळ्याप्रकरणी रॉबर्ट वड्रा यांनी अटकपूर्व जामीन मागितला आहे. असा दावा गौरव भाटीया यांनी केला आहे.
सोनिया गांधी जी क्या ये सत्य नहीं है कि मई 2019 में ED ने ही 65 करोड़ रुपये की संपत्ति को जब्त किया था।
आपके पास समय था, आप न्यायालय गए।
क्या न्यायालय ने कहा कि ये गलत जब्त किया है?
– श्री @gauravbh
— BJP LIVE (@BJPLive) June 2, 2022
तसेच प्राप्तिकर विभागाने डिसेंबर 2017 मध्ये एक आदेश पारित केला की, सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांना या घोटाळ्यातून एकूण 414 कोटी रुपयांचा नफा झाला आणि त्यांनी 250 कोटी रुपयांचा कर भरावा असा आदेश दिला.
याविरोधात काँग्रेस नेते न्यायालयातही गेले पण त्यांना दिलासा मिळाला नाही. सोनिया गांधी जी, मे 2019 मध्ये ED ने 65 कोटी रुपयांची संपत्ती जप्त केली होती हे खरे नाही का? तुमच्याकडे वेळ होता, तुम्ही कोर्टात गेलात, कोर्टाने खोटी जप्ती असल्याचे सांगितले का? असा सवालही गौरव भाटीया यांनी केला आहे.
महत्वाच्या बातम्या:
- काँग्रेसचा ‘हात’ सोडल्यानंतर भाजपमध्ये पटेलांचं ‘हार्दिक’ स्वागत! गांधीनगर येथे पक्षप्रवेश
- SL vs AUS 2022 : ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघ ‘प्रशिक्षका’विना पोहोचला श्रीलंकेत; ६ वर्षानंतर खेळणार यजमानांसोबत मलिका
- “जेवढं शक्य होतं तितकं…”, जीएसटीवरील भाजपच्या टीकेला अजित पवारांचे प्रत्युत्तर
- राज ठाकरेंनी केले ‘सरसेनापती हंबीरराव’ चित्रपटाचे कौतुक, दिग्दर्शक प्रवीण तरडेंसोबत मारल्या गप्पा
- राहुल गांधींना ईडीचं आजच बोलावणं; विदेशात असल्याचे कारण सांगत म्हणाले…


