अलाहाबाद : बॉलिवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा ही नेहमीच काही ना काही कारणांमुळे चर्चेत असते. गेल्या काही दिवसांपासून सोनाक्षीच्या विरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी करण्यात आल्याचे बोललं जात आहे. हे संपूर्ण प्रकरण चार वर्षापूर्वीचे आहे. नुकतंच या संपूर्ण प्रकरणी सोनाक्षी सिन्हाने एक अधिकृत वक्तव्य जारी केले आहे. ‘मला त्रास देण्यासाठी हे सर्व केले जात आहे. संबंधित आरोपी माझ्याकडून पैसे उकळण्याचा प्रयत्न करत असल्याचा दावाही सोनाक्षी सिन्हाने केला आहे.’
सोनाक्षी सिन्हा ही सोशल मीडियावर कायमच सक्रीय असते. गेल्या काही दिवसांपासून सोनाक्षी सिन्हाच्या विरोधात एक अजामीनपात्र वॉरंट जारी करण्यात आल्याच्या बातम्यांना वेग आला आहे. नुकतंच सोनाक्षीने इन्स्टाग्रावर एक पोस्ट शेअर करत याबाबत निवेदन जारी केले आहे.
यात ती म्हणाली, “कोणत्याही अधिकाऱ्याची पडताळणी न करता गेल्या काही दिवसांपासून माझ्याविरुद्ध अजामीनपात्र वॉरंट जारी झाल्याच्या अफवा मीडियामध्ये पसरत आहेत. याद्वारे मला त्रास देण्याचा प्रयत्न केला जात आहे. मी सर्व मीडिया हाऊसेस, पत्रकार आणि वार्ताहरांना विनंती करते की अशाप्रकारच्या खोट्या बातम्या पसरवू नका. कारण या माध्यमातून प्रसिद्धी मिळवणे हा त्या व्यक्तीचा अजेंडा असू शकतो. ती संबंधित व्यक्ती माझ्या प्रतिष्ठेवर पूर्णपणे हल्ला करत आहे. त्याद्वारे प्रसिद्धी मिळवण्याचा आणि माझ्याकडून पैसे उकळण्याचाही तो प्रयत्न करत आहे.”
महत्वाच्या बातम्या :
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

