पुणे : महिलांना त्यांच्या हक्काची जाणीव व्हावी, त्यांचे जीवन सुधारावे यासाठी ८ मार्चला जागतिक महिला दिन साजरा केला जातो. आज महिला चौकटीबाहेर पडून जगाला गवसणी घालत आहेत. खेळापासून मनोरंनापर्यंत, राजकारण, लष्कर, संरक्षण मंत्रालयापर्यंत विविध मोठ्या भूमिका त्या बजावत आहेत. त्यामुळे त्यांच्या कामाची दखल आता सर्व पातळीवर घेतली जात आहे. या दिवसाची सुरूवात कशी झाली? यंदाची थीम काय त्याची माहिती असणे गरजेचे आहे.
महिलांना त्यांच्या हक्काची जाणीव व्हावी, त्यांचे जीवन सुधारावे यासाठी ८ मार्चला जागतिक महिला दिन साजरा केला जातो. आज महिला चौकटीबाहेर पडून जगाला गवसणी घालत आहेत. खेळापासून मनोरंनापर्यंत, राजकारण, लष्कर, संरक्षण मंत्रालयापर्यंत विविध मोठ्या भूमिका त्या बजावत आहेत. त्यामुळे त्यांच्या कामाची दखल आता सर्व पातळीवर घेतली जात आहे. या दिवसाची सुरूवात कशी झाली? यंदाची थीम काय त्याची माहिती असणे गरजेचे आहे.
यंदाची थीम अशी जेंडर इक्वॅलिटी टुडे फॉर अ सस्टेनेबल टुमॉरो’ ही आंतरराष्ट्रीय महिला दिन २०२२ ची थीम आहे. याचा अर्थ मजबूत भविष्यासाठी लैंगिक समानता गरजेची आहे. तर या निमित्ताने जांभळा, हिरवा आणि पांढरा असे रंग देण्यात आले आहेत. जांभळा रंग न्याय आणि सन्मानाचे प्रतीक आहे. हिरवा रंग आशेचे प्रतीक आहे आणि पांढरा रंग शुद्धतेचे प्रतीक आहे.हा दिवस साजरा करण्याचे कारण महिलांवरील भेदभाव संपविण्यासाठी हा दिवस जगभरात साजरा केला जातो. हा दिवस महिलांच्या विकासावर लक्ष केंद्रित करण्यासाठी आणि त्यांच्या कर्तृत्वाचा अभिमान वाटावा यासाठीही साजरा केला जातो.
महत्वाच्या बातम्या :
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

