नवी दिल्ली : आयपीएलच्या १५ व्या हंगामाला सुरुवात होण्यास काहीच दिवस बाकी आहेत. रविवारी बीसीसीआयने स्पर्धेचे संपूर्ण वेळापत्रक जाहीर केले आहे. कोणता संघ कोणाविरुद्ध कधी आणि कुठे खेळणार हे आता स्पष्ट झाले आहे. आयपीएलचे सर्वाधिक ५ विजेतेपद जिंकणाऱ्या मुंबई इंडियन्सच्या लढती कोणासोबत आहेत याची उत्सुकता सर्वांनाच लागली आहे.
रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या मुंबई इंडियन्सचा आयपीएल २०२२ मधील पहिला सामना २७ मार्च रोजी दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध होणार आहे. ही लढत सीसीआयच्या ब्रेबॉर्न स्टेडियमवर होईल. तर साखळी फेरीतील मुंबईची अखेरची लढत २१ मे रोजी होणार आहे. याच पार्श्वभूमीवर जाणून घेऊयात मुंबई चे या हंगामातील वेळापत्रक…
मुंबईचे वेळापत्रक २०२२ :
२७ मार्च – विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स – ब्रेबॉर्न स्टेडियम – दुपारी ३.३०
०२ एप्रिल – विरुद्ध राजस्थान रॉयल्स – डीवाय पाटील स्टेडियम – दुपारी ३.३०
०६ एप्रिल – विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स – एमसीए स्टेडियम – रात्री ७.३०
१३ एप्रिल – विरुद्ध पंजाब किंग्ज – एमसीए स्टेडियम – रात्री ७.३०
२१ एप्रिल – विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज – डीवाय पाटील स्टेडियम – रात्री ७.३०
२४ एप्रिल – विरुद्ध लखनौ सुपर जायंट्स – वानखेडे स्टेडिमय – रात्री ७.३०
३० एप्रिल – विरुद्ध राजस्थान रॉयल्स – डीवाय पाटील स्टेडियम – रात्री ७.३०
०६ मे – विरुद्ध गुजरात टायटन्स – ब्रेबॉर्न स्टेडियम – रात्री ७.३०
०९ मे – विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स – डीवाय पाटील स्टेडियम – रात्री ७.३०
१२ मे – विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज – वानखेडे स्टेडियम – रात्री ७.३०
१७ मे – विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद – वानखेडे स्टेडियम – रात्री ७.३०
२१ मे – विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स – डीवाय पाटील स्टेडियम – रात्री ७.३०
महत्वाच्या बातम्या :


