Share

“सुमीत कुमार नरवरकडे भाजपच्या बड्या नेत्याचा पैसा”, राऊतांचा गौप्यस्फोट

Published On: 

मुंबई: सुमित कुमार नरवरच्या (Sumeet Kumar Narwar) नावाचा मी यापूर्वीही उल्लेख केला होता. बुलंद शहरातील या दूध विकणाऱ्या सामान्य माणसाकडे चार-पाच वर्षात आठ हजार कोटी रुपये कसे काय आले? आता मलबार हिलमध्ये तो राहतो. पूर्वी तो नोएडात राहत होता. त्याला राहायला घरही नव्हतं. याचकडे एवढा पैसा आला कुठून? असा सवाल करत सुमीत कुमार नरवरकडे भाजपच्या बड्या नेत्याचा पैसा असल्याचा खुलासा संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केला आहे.

तसेच त्याचे सर्व रेकॉर्ड माझ्याकडे आहे. हा सर्व पैसा कुणाचा आहे, ट्रायडन्ट कुणाचा आहे? याबाबत ईडीला काही दिसत नाही का? ईडीने कोणता चष्मा लावला आहे. जरा आमच्याकडेही त्या चष्म्यातून पाहा. मी त्यांच्या विरोधातील सर्व पुरावे देतो. असे संजय राऊत म्हणाले आहेत. ते शिवसेना भवनात शिवसेना पत्रकार परिषदेत बोलत होते.

तसेच आयकर आणि ईडीला मी पुराव्यासह ५० नावं पाठवली असून मी वारंवार त्याचा उल्लेखही केला आहे. पण ईडी आणि आयकरला एक जबाबदार खासदार काही बोलत असेल तर त्यावर चौकशी झाली पाहिजे असं वाटत नाही. आमच्याबाबतीत हे बोगस ते बोगस असं म्हटलं. किरीट सोमय्याने एका केंद्रीय मंत्र्यांबाबत बोगस कंपन्यांची लिस्ट दिली होती. त्याचं काहीच झालं नाही. कोणी ढवंगाळे यांच्या ७५ बोगस कंपन्यांची यादी मी स्वत: पाठवली. काय झालं त्याच? असा सवाल करत संजय राऊत यांनी किरीट सोमय्या यांच्यावरही निशाणा साधला आहे.

महत्वाच्या बातम्या: 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!