🕒 1 min read
मुंबई: शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी आज शिवसेना भवनात पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी ईडीच्या धाडीवरून भाजपला टार्गेट केले. तसेच भाजप नेते किरीट सोमय्या सोबतच जितेंद्र नवलानी, सुमीत कुमार नरवर अशी नावे घेत यांच्याबाबत मोठा खुलासाही केला. मात्र आता यावरच भाजप नेते केशव उपाध्ये (Keshav Upadhye) यांनी ट्वीट करत टोला लगावला आहे.
“कोणताही कागद नाही, कोणताही ठोस पुरावा नाही, यावेळी तर सेनेतील लोकही सोबत नाहीत कसली प्रेस कसले आणि आरोप संजय राऊत? बर एवढे पुरावे होते तर इतका वेळगप्प का बसले? नुसत्या धमक्या देण्याएवजी न्यायालयात का गेला नाहीत? पत्र लिहीणे म्हणजे पुरावा नाही, हेआपल्या सारख्या संपादकाला सांगाव का?”, असा खोचक टोला केशव उपाध्ये यांनी लगावला आहे.
कोणताही कागद नाही,
कोणताही ठोस पुरावा नाही, यावेळी तर सेनेतील लोकही सोबत नाहीत…कसली प्रेस कसले आरोप @rautsanjay61
बर एवढ पुरावे होते तर इतका वेळगप्प का बसले?
नुसत्याधमक्या देण्याएवजी न्यायालयात कागेला नाहीत? पत्र लिहीणेम्हणजे पुरावा नाही,हेआपल्या सारख्या संपादकाला सांगाव का ?— Keshav Upadhye (@keshavupadhye) March 8, 2022
दरम्यान ईडीबाबद पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे पुरावे पाठविले असून ही सर्व माहिती पत्रात आहे आणि टप्प्याटप्प्याने बाहेर येईल. मात्र तो फक्त एक पार्ट आहे. असे मी अजून १० पार्ट पाठवणार असल्याचेही राऊत यांनी म्हटले आहे.
महत्वाच्या बातम्या :
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
