मुंबई : बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन सध्या सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय असतात. सोशल मीडियावर बरेच फोटो ते शेअर करत असताना पाहायला मिळतात. तसेच अनेक मुद्यांवर ते आपले मत मांडत असतात. काही दिवसापूर्वी त्यांनी एक ट्वीट केले आहे. ज्यामुळे त्यांना सोशल मीडियावर ट्रोल करण्यात येत आहे.
T 3970 – कुछ है नहीं लिखने को !!
— Amitabh Bachchan (@SrBachchan) July 16, 2021
अमिताभ बच्चन यांनी १७ जुलैला एक ट्वीट करत म्हटले की, “लिहायला काही नाही”. बिग बींच्या या ट्वीटवर अनेकांनी त्यांना जर लिहायला काही नसेल तर त्यांनी काय लिहावं हे सांगितले आहे. एक युजर म्हणाला, ‘मग पेट्रोलवर लिहा.’ तर दुसरा युजर म्हणाला, ‘हो नक्कीच लिहिण्यासाठी आहे. थोडी जरी लाज शिल्लक असेल तर यावेळी पेट्रोलवर काही बेधडक लिहून दाखवा,’असे म्हणत त्यांना काही लिहायला नसेल तर पेट्रोलच्या सतत वाढत जाणाऱ्या किंमतींतींबवर लिहिण्यास सांगितले आहे.
https://twitter.com/DevashishGuptaa/status/1416135144289841158?s=20
अमिताभ यांचा ‘चेहरे’ हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात त्यांच्यासोबत अभिनेता इम्रान हाश्मी मुख्य भूमिकेत दिसणार आहे. सध्या अमिताभ हे ‘गूड बाय’ चित्रपटाचे चित्रीकरण करत आहेत. त्यांचा आलिया भट्ट आणि रणबीर कपूरसोबत ‘बह्मास्त्र’ हा चित्रपट देखील लवकरच प्रदर्शित होणार आहे. तसेच त्यांचा ‘झुंड’ हा चित्रपट देखील लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘पंकजा मुंडे नव्हे तर त्यांचे समर्थक नाराज आहेत’, चंद्रकांत पाटील यांची माहिती
- फरहान अख्तरच्या ‘तुफान’ चित्रपटाची शाहरुख खानने केली प्रशंसा, म्हणाला…
- आणखी एक सचिन वाझे ऊर्जा विभागात असल्याचा मनसेचा गंभीर आरोप
- शाह-फडणवीसांची दिल्लीत भेट; सहकार क्षेत्रातील गैरव्यवहार प्रकरणात मोठी कारवाई होणार ?
- भारतीय फोटोजर्नलिस्ट दानिश सिद्दिकी यांची तालिबान्यांकडून हत्या
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

