🕒 1 min read
मुंबई : भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या व आमदार गोपीचंद पडळकर हे दोन फायरब्रँड नेते एकत्रित येवून राष्ट्रवादी काँग्रेसच्या होम ग्राउंडवर धडाडणार होते. मात्र त्यांचा नियोजित दौरा आता रद्द झाल्याची माहिती मिळत आहे. तसेच त्यांच्यासोबत माजी मंत्री बाळा भेगडे देखील असणार बारामती दौऱ्यावर जाणार होते. सोमय्या बारामती दौऱ्यावर जाणार असून भाजप संबंधित आणि इतर काही संघटनांचे पदाधिकारी त्यांना भेटणार होते. पण त्याच्या कार्यालयाकडून सोमय्या यांचा हा दौरा रद्द झाल्याची माहिती देण्यात आली आहे.
सोमय्या यांच्या बारामती दौऱ्याच्या बारामतीसह राज्याच्या राजकारणात चर्चांना उधाण आलं होतं. मात्र सोमय्या यांचा दौरा अचानक रद्द झाल्याने आता वेगळ्याच चर्चा सुरु झाल्या आहेत. किरीट सोमय्या यांनी सध्या प्रादेशिक परिवहन अधिकारी असलेल्या बजरंग खरमाटे यांना लक्ष्य केलेले आहे. त्यांच्या संपत्तीबाबत माहिती गोळा करण्यासाठी सोमय्या यांनी नुकतीच सांगली येथे काही दिवसांपूर्वी भेट दिली आहे.
सांगली येथे सोमय्या यांनी काही सेल्फीही काढलेले होते. सांगली पाठोपाठ सोमय्या हे बारामतीमध्ये जाणार होते. याबाबत सोमय्यांनी स्थानिक पदाधिकाऱ्यांना कागदपत्रांची माहिती घेण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यावरुन भाजपचे जिल्हा सरचिटणीस अविनाश मोटे यांनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी संबंधिसोमय्या-पडळकरांचा ‘तो’ प्लॅन फसला; बारामती दौरा झाला रद्द त कागदपत्रे मिळवून किरीट सोमय्या यांच्या कार्यालयामध्ये पाठवली आहेत. मात्र आज त्यांच्या मुंबई कार्यलयामध्ये फोन केल्यानंतर त्यांच्या बारामती दौरा रद्द झाल्याची माहिती देण्यात आली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘मुंबई महापालिकेच्या शाळेत केंब्रिज बोर्ड सुरू होणार’, आदित्य ठाकरेंची घोषणा
- मुख्यमंत्र्यांचे ‘खास’ नार्वेकर यांचा बंगला तोडला, आता परब आणि सरनाईक यांचा नंबर – सोमय्या
- पुरुषप्रधान संस्कृती मागे टाकत ५ मुलींनी आपल्या आईच्या पार्थिवाला दिला खांदा
- ‘न सांगताही नांदेडमध्ये हजारो लोक जमा झाले, सांगून बघू का?’ मग बघा!
- माझ्यामुळे काही मंत्र्यांची झोप उडाली आहे, त्यामुळे ते भाई लोकांची मदत घेत आहेत – सोमय्या
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
