ठाणे : भाजपचे फायरब्रँड नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. सोमय्यांना थेट केंद्र सरकारने सुरक्षा पुरवली आहे. त्यामुळे आता किरीट सोमय्यांभोवती तब्बल 40 CISF जवानांच्या सुरक्षेचं कवच असेल. सोमय्यांना केंद्र सरकारने आता Z दर्जाची सुरक्षा पुरवली आहे.
किरीट सोमय्या यांनी गेल्या काही दिवसांमध्ये ठाकरे सरकारमधल्या अनेक नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप केले आहेत. आणि त्यानंतर त्यांना धमक्या देण्यात आल्याचा दावाही त्यांनी केला आहे. या धमकीनंतर किरीट सोमय्या यांना केंद्राने सुरक्षा पुरवली आहे. दरम्यान, यानंतर किरीट सोमय्या यांनी आता ठाकरे सरकारमधील मंत्र्यांवर गंभीर आरोप केले आहेत.
माझ्यामुळे काही मंत्र्यांची झोप उडाली आहे. त्यामुळे ते भाई लोकांची मदत घेत आहेत, असा गंभीर आरोप किरीट सोमय्या यांनी केला आहे .ठाकरे सरकारला ठिकाण्यावर आणण्याचे काम मी करत आहे. त्यामुळे अनेक मंत्र्यांची झोपमोड झाली आहे. काही मंत्री भाई लोकांची मदत घेत आहे, असं सांगतानाच वाशीममध्ये माझ्यावर जो हल्ला झाला त्यात भावना गवळींचे काही भाई लोक होते. तसं रिपोर्टमध्येही आलं आहे. त्यामुळेच केंद्र सरकारच्या गृह मंत्र्यांनी मला सुरक्षा देण्याचा निर्णय घेतला आहे, असं सोमय्या यांनी सांगितलं.
मी माझे काम करत आहे. मुख्यमंत्र्यांपासून अनेक जण घोटाळेबाज आहेत. उद्धव ठाकरे यांचे गुंड मला गोळ्या झाडण्याच्या धमकी देत आहेत. पण मी सुरक्षा मागितली नाही. मागणारही नाही. माझाबाबत जी धमकी आली ते फक्त नाटक आहेय नुसती एनसी पोलिसांनी घेतली, असंही ते म्हणाले.
महत्त्वाच्या बातम्या
- शिखर धनव-आयशा मुखर्जी यांचा घटस्फोट; आयशाची भावूक पोस्ट
- ‘तुम्ही मराठी माणसाच्या पाठीत खंजीर खुपसला हे बेळगावलाच नाहीतर अखंड हिंदूस्थानाला समजले आहे’
- ‘ते’ शिवसेनेचे नाही म्हणून ते मराठी नाही का संज्या? तुझ्यासारखा रड्या या जगात दुसरा सापडणार नाही
- ब्राह्मण समजाबाबत वादग्रस्त वक्तव्य केल्या प्रकरणी छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांच्या वडिलांना अटक
- शरद पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीच्या आजी – माजी आमदारांची महत्वाची बैठक सुरु


