Share

‘न सांगताही नांदेडमध्ये हजारो लोक जमा झाले, सांगून बघू का?’ मग बघा!

Published On: 

🕒 1 min read

मुंबई: खासदार संभाजीराजे भोसले यांनी मराठा आरक्षणाचा मुद्दा लावून धरला आहे. त्यातच आता त्यांनी पुन्हा एकदा ठाकरे सरकारवर निशाना साधला आहे. त्यांनी काही दिवसांपूर्वी नांदेड येथे सभा घेतली होती. त्यावेळी न सांगताही तेथे ५० ते ६० हजार लोक जमा झाले होते. नांदेड ही फक्त एक झलक होती. तीही न सांगता. सांगून बघू का? मग बघा. असा इशारा त्यांनी ठाकरे सरकारला दिला आहे.

राज्य सरकारने पाठवलेलं पत्र अधिकाऱ्यांनी लिहून पाठवले आहे. फक्त पाठवायचं म्हणून हे लेखी उत्तर पाठवले. मुख्यमंत्र्यांनी देखील याची पुरेशी दखल घेतली नाही. असेही त्यांनी म्हटले आहे. आज मुंबईत पत्रकार परिषदेत त्यांनी हे वक्तव्य केले आहे.

आवाज उठवायचा म्हटला, तर मी उठवू शकतो. आम्ही न बोलवताही जर नांदेडला ५० ते ७० हजार लोक हजर होतात, तर रायगडसारख्या ठिकाणी आम्ही सुरुवात करू. जर सरकार आमची दखल घेत नसेल तर आम्ही जे करायचं ते करू पण मग रायगडावर नांदेडसारखी गर्दी जमली तर याची जबाबदारी माझी नसणार, असा इशाराही त्यांनी ठाकरे सरकारला दिला आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!