ठाणे : मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या पत्नी रश्मी ठाकरे, माजी गृहमंत्री अनिल देशमुख, परिवहन मंत्री अनिल परब, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निकटवर्तीय आणि शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर, संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत, शिवसेना खासदार भावना गवळी, मंत्री जितेंद्र आव्हाड आदींसह एकूण १२ जणांवर गंभीर आरोप करत ईडी, सीबीआय चौकशीची मागणी करण्यासह भाजप नेते किरीट सोमय्या यांनी पोलिसांमध्ये तक्रारी दाखल केल्या आहेत.
काही दिवसांपूर्वी मिलिंद नार्वेकर यांच्या बंगल्यावर सोमय्या यांच्या तक्रारी नंतर कारवाई करण्यात आली होती. आता त्यांनी परब आणि सरनाईक यांच्याकडे आपला मोर्चा वळवला आहे. किरीट सोमय्या यांनी आज ठाणे महापालिका आयुक्त विपीन शर्मा यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी प्रताप सरनाईक यांच्या अनधिकृत बांधकामांबाबत त्यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर सोमय्या यांनी मीडियाशी संवाद साधला.
यावेळी ते म्हणाले, ‘आम्ही पालिका आयुक्त डॉ विपीन शर्मा यांची भेट घेतली. विहंग गार्डन इमारतमधील लोकांची लवकरात लवकर सुटका करण्याची मागणी त्यांच्याकडे केली आहे. तसेच सरनाईक यांच्या अनधिकृत बांधकामांबाबत पालिकेने त्यांच्याकडून 21 कोटी रुपयांचा दंड वसूल करावा अशी मागणी मी आयुक्तांना केली आहे. त्याचाच पाठपुरावा करण्यासाठी मी आज आलो होतो.’
तर, ‘मिलिंद नार्वेकर यांचा बंगला तोडला गेला. आता अनिल परब यांचे ऑफिस तुटणार आणि प्रताप सरनाईक यांच्या अनधिकृत बांधकामवर कारवाई होणार यासाठी मी ठाणे महापालिका आयुक्त यांना भेटायला आलो आहे,’ असं देखील सोमय्या म्हणाले. यासोबतच त्यांनी, ‘ठाकरे सरकार सरनाईक यांच्याकडून 21 कोटी दंड का वसूल करत नाही? सरनाईक यांच्या अनधिकृत बांधकामांवर कारवाई कधी करणार?,’ असे सवाल देखील केले आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
- बाप हा बापच.., असावा, पण तो आयत्या बिळावरचा नागोबा नको- विनायक राऊत
- ‘तुम्ही मराठी माणसाच्या पाठीत खंजीर खुपसला हे बेळगावलाच नाहीतर अखंड हिंदूस्थानाला समजले आहे’
- ‘हे’ लोक एक होऊन सुद्धा मोदी होऊ शकत नाहीत – किरीट सोमय्या
- ब्राह्मण समजाबाबत वादग्रस्त वक्तव्य केल्या प्रकरणी छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांच्या वडिलांना अटक
- शरद पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीच्या आजी – माजी आमदारांची महत्वाची बैठक सुरु


