मुंबई: कोरोनामुळे दोन वर्षांपासून राज्यातील शाळा बंद आहेत. त्यातच महापालिकेच्या शाळेतील गळतीचे प्रमाणही वाढतच आहे. यावरच राज्याचे पर्यावरण मंत्री तथा मुंबईचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी एक मोठी घोषणा केली आहे. आता मुंबई महापालिकेच्या शाळेत केंब्रिज बोर्ड सुरू होणार असल्याचा निर्णय घेतला जाणार आहे. अशी घोषणा आदित्य ठाकरे यांनी केली आहे. सीबीएसई, आयसीएसई शाळा सुरु केल्यानंतर आता मुंबई महापालिकेच्या शाळेत केंब्रिज बोर्डाचं शिक्षणही घेता येईल असे त्यांनी म्हटले आहे.
आज आपण केंब्रिज बोर्डाचा एक महत्त्वाचा पल्ला पार करत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. पुढचे दोन महिने याबाबत किती शाळा आपण घेऊ शकतो. सुरुवातीला एक शाळा जरी असेल. तरी प्रत्येक वार्डमध्ये कमीत कमी एक शाळा तरी करू शकू का? जेणेकरून जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना याचा फायदा घेता येईल. विद्यार्थ्यांना करिअर, रिसर्चसाठी भविष्यात त्याचा फायदा होईल. असे मत आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केले आहे.
‘Mumbai Public School’ was envisioned with a goal to ensure equality of quality in the city’s municipal schools. In this, our teachers are the backbone of education. pic.twitter.com/GSa9QkByQl
— Aaditya Thackeray (@AUThackeray) September 5, 2021
तसेच २०१३ साली व्हर्चुअल क्लासरुमची संकल्पना महापालिका शाळांमध्ये प्रत्यक्षात आणण्यात आली. तसेच सीबीएसई, आयसीएसई बोर्डाशीही काही शाळांची संलग्नता करण्यात आली, त्याच पद्धतीने केंब्रिज बोर्डासमवेतही संलग्नता करण्यासाठी प्रयत्न करण्यात येत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
- शिखर धनव-आयशा मुखर्जी यांचा घटस्फोट; आयशाची भावूक पोस्ट
- ‘तुम्ही मराठी माणसाच्या पाठीत खंजीर खुपसला हे बेळगावलाच नाहीतर अखंड हिंदूस्थानाला समजले आहे’
- ‘ते’ शिवसेनेचे नाही म्हणून ते मराठी नाही का संज्या? तुझ्यासारखा रड्या या जगात दुसरा सापडणार नाही
- ब्राह्मण समजाबाबत वादग्रस्त वक्तव्य केल्या प्रकरणी छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांच्या वडिलांना अटक
- शरद पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीच्या आजी – माजी आमदारांची महत्वाची बैठक सुरु
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

