Share

पुरुषप्रधान संस्कृती मागे टाकत ५ मुलींनी आपल्या आईच्या पार्थिवाला दिला खांदा

Published On: 

गडचिरोली : भारत हा पुरुष प्रधान देश आहे. अंत्यसंस्कारावेळी पुरुषप्रधान संस्कृतीला मागे टाकणारी एक घटना गडचिरोलीमध्ये घडली आहे. गडचिरोली जिल्ह्यातील कोरची गावात एका महिलेचा मृत्यू झाला. या महिलेला मुलगा नाही म्हणून तिच्या ५ मुलींनी आपले अश्रू आवरत पार्थिवाला खांदा दिला. महिलेच्या अंतिम निरोपाचा हा दु:खद प्रसंग शेकडो गावकऱ्यांनी अनुभवला. मुलगा नसल्यामुळे पाच मुलींनी आईच्या पार्थिवाला खांदा देऊन अंतिम संस्कार केले. मुलगा नसल्याची कोणतीही उणीव यावेळी त्यांच्या पाच लेकींनी भासू दिली नसल्याचं जिवंत उदाहरण पाहायला मिळालं आहे.

निर्मला पाकलवार यांनी वयाच्या ६० व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. पाकलवार यांना ५ मुली आहेत. त्यामुळे त्यांच्या मुलींनी पार्थिवाला खांदा देऊन अंत्यविधीसाठी पार्थिव स्मशानभूमीत नेले. त्यानंतर पार्थिवाला मुखाग्नीही मुलींनीच दिला. त्यामुळे पंचक्रोशीत हा विषय चांगलाच चर्चेचा ठरला आहे.

निर्मला यांचे पती अण्णाजी रामचंद्र पाकलवार हे माजी मुख्याध्यापक असून त्यांच्यावर पुरोगामी विचारांचा पडगा आहे. मुलगा नसल्याची खंत त्यांना आयुष्यभर कधीही वाटली नाही. पत्नी गेल्यानंतरही आपल्या मुलींनी अंत्यसंस्कार करावे, या मताचे ते होते. त्यानुसार त्यांच्या ५ मुलींनी आपल्या लाडक्या आईला निरोप दिलाय.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!