मुंबई : भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या हे महाविकास आघाडी सरकार आल्यापासून एकामागे एक गंभीर आरोप करत असून त्यांनी विविध प्रकरणांची चौकशी व्हावी अशी मागणी केली आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या पत्नी रश्मी ठाकरे, माजी गृहमंत्री अनिल देशमुख, परिवहन मंत्री अनिल परब, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निकटवर्तीय आणि शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर, संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत, शिवसेना खासदार भावना गवळी आदींसह एकूण ११ जणांवर गंभीर आरोप करत ईडी, सीबीआय चौकशीची मागणी करण्यासह किरीट सोमय्या यांनी पोलिसांमध्ये तक्रारी दाखल केल्या आहेत.
दरम्यान, आता किरीट सोमय्या यांच्यावर देखील महाविकास आघाडीतील नेते पलटवार करत आहेत. ‘किरीट सोमय्या यांना यांना ED, CBI च्या नावाने धमक्या द्यायची इतकी सवय झालीय की ते जवळच्यांनाही धमक्या देत असतील. आचाऱ्याने मीठ कमी टाकले- मीठाचे पैसे खाल्लेस ED ची नोटीसच येईल तुला, मित्राला उशीर झाला- CBI ला तक्रारच करतो, काॅलनीतल्या मुलांचा बॉल लागला- तुम्ही दिवाळीपर्यंत जेलमध्ये जाणार,’ असं म्हणत काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी सोमय्या यांची खिल्ली उडवली आहे.
.@KiritSomaiya यांना ED, CBI च्या नावाने धमक्या द्यायची इतकी सवय झालीय की ते जवळच्यांनाही धमक्या देत असतील
आचाऱ्याने मीठ कमी टाकले- मीठाचे पैसे खाल्लेस ED ची नोटीसच येईल तुला
मित्राला उशीर झाला- CBI ला तक्रारच करतो
काॅलनीतल्या मुलांचा बॉल लागला- तुम्ही दिवाळीपर्यंत जेलमध्ये जाणार https://t.co/OECoMDmXC6— Sachin Sawant सचिन सावंत (@sachin_inc) August 31, 2021
अनिल परब यांनी आज ईडी चौकशीला हजर राहण्यास असमर्थता दर्शवल्यानंतर किरीट सोमय्या यांनी एक ट्विट केलं होतं. या ट्विटवरून सचिन सावंत यांनी त्यांच्यावर निशाणा साधला आहे. ‘प्रताप सरनाईक ED कडे गेले नाहीत. अनिल देशमुख ईडी कडे जात नाही. अनिल परब ED कडे जाणार नाहीत,’ असं सोमय्या यांनी म्हटलं आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- सर्वोच्च न्यायालयात मराठा समाजाची बाजू समर्थपणे मांडण्यात राज्य सरकार सपशेल नाकाम ठरले – काकडे
- आयपीएलमध्ये पुन्हा १० संघ! स्पर्धेचे स्वरुपही बदलण्याची शक्यता
- ‘अण्णा हजारे इतके दिवस कुठे होते?’, मंदिराच्या मुद्द्यावरून राज ठाकरेंचा सवाल
- ‘नाक्यावर संजय राऊत सारखे माणसे पैसे देऊन विकत घेता येतात’, नितेश राणेंचा टोला
- ‘भास्कर जाधवच्या मुलाने मंदिरात अभिषेक केलेला चालतो, पण सामान्यांसाठी मंदिरे बंद’
- ‘लॉकडाऊन आवडे मोदींना असे का म्हणत नाही?’ काँग्रेसचा भाजपसह मनसेला टोला
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

