मुंबई : यंदाची आयपीएल स्पर्धा कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे अर्ध्यातच स्थगित करण्यात आली होती. यानंतर उर्वरीत स्पर्धेच्या आयोजनाबद्दल प्रश्न उभे होते. तसेच आगामी हंगामात बीसीसीआयने दोन नवीन संघाची निवडही स्थगीत होण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती.
मात्र कोरोनाच्या या कठीण परिस्थीतीतही बीसीसीआयने स्पर्धा आयोजीत करण्याचा चंग बांधला आहे. ठरल्याप्रमाणे आगामी आयपीएल स्पर्धेत दोन नवीन संघाचा समावेश केला जाणार हे निश्चीत झाले आहे. त्यांची मुळ किमंतही ठरली आहे. २००० हजार कोटी रुपये इतकी किमंत संघाची ठरली आहे. स्पर्धेत संघाची वाढ झाल्यामुळे स्पर्धेचे स्वरुपही बदलले जाण्याची शक्याता आहे. यापुर्वी स्पर्धेत प्रत्येक संघ एकमेकाशी २ सामने खेळायचा. मात्र आता तसे होणार नाही.
आगामी स्पर्धेत ५-५ संघाचे दोन गट विभागून देण्यात येणार आहे. या दोन गटात प्रत्येक संघाला ८ सामने खेळावे लागतील. यातील घरच्या मैदानावर ४ सामने आणि बाहेरच्या मैदानावर ४ सामने होतील. यामुळे संघाची वाढ जरी झाली तरी सामन्याची संख्या केवळ १४ ने वाढणार आहे. सध्या आयपीएलमध्ये ६० सामने होतात. संघाची संख्या वाढल्यानंतर मात्र ७४ सामने होतील. यापुर्वी २०११ साली झालेल्या आयपीएल स्पर्धेत १० संघाचा समावेश करण्यात आला होता. त्यावेळी सहारा पुणे वॉरीयर आणि कोची टस्कर्स या दोन संघाचा समावेश करण्यात आला होता.
जर स्पर्धा सध्या सुरु आहे त्याप्रकारे खेळवली तर सामन्याची संख्या ९४ इतकी होईल. यामुळे परदेशी खेळाडूंच्या उपस्थितीविषयी प्रश्नचिन्ह उभे राहु शकते. तसेच आयसीसीने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार प्रत्येक वर्षी एक मोठी स्पर्धा होणार आहे. त्या अनुषंगाने बीसीसीआयने हा उपाय काढला आहे. मात्र १४ सामने वाढल्याने बीसीसीआयला तब्बल ८०० कोटी रुपयांची कमाई करण्याची संधी आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- आयपीएल २०२२ स्पर्धेतील दोन नव्या संघाची मुळ किंमत ठरली
- कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे भारतीय महिला क्रिकेट संघाच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यात बदल
- ‘राज्यात कोरोना लाट येतेय म्हणे, लाट यायला समुद्र आहे काय?’, मनसेचा खोचक टोला
- दरड कोसळली: औट्रम घाटात मदतकार्य सुरू, जिल्हाधिकाऱ्यांनी केली पाहणी
- ‘अण्णा हजारे इतके दिवस कुठे होते?’, मंदिराच्या मुद्द्यावरून राज ठाकरेंचा सवाल
- ‘नाक्यावर संजय राऊत सारखे माणसे पैसे देऊन विकत घेता येतात’, नितेश राणेंचा टोला


