Share

‘लॉकडाऊन आवडे मोदींना असे का म्हणत नाही?’ काँग्रेसचा भाजपसह मनसेला टोला

Published On: 

मुंबई : कोरोना महामारीने मागील वर्षीपासून जगभरात थैमान घातले आहे. बऱ्याच देशांमधील कोरोना हा पूर्णपणे आटोक्यात येत असला तरी भारतात मात्र अजूनही संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका हा कायम आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत महाराष्ट्रासह देशभरात हाहाकार माजवला होता. यामुळे आता निर्बंधांमध्ये सूट देताना राज्य सरकार व प्रशासन हे गंभीरतेने विचार करूनच निर्णय घेत आहेत.

यंदा देखील कोरोनाचे सावट कायम असल्याने सर्व धर्मियांनी सण-उत्सव साधेपणाने साजरे करावे असे आवाहन केले जात आहे. दरम्यान, बहुतांश निर्बंधांमध्ये राज्य सरकारने सूट दिली आहे. तिकडे गर्दी होतेय मग मंदिरे बंद ठेवण्यासह सण-उत्सव साजरे करण्यावर निर्बंध का ? असा सवाल करत भाजपसह मनसेचे महाविकास आघाडी सरकारवर हल्लाबोल केला आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी लॉकडाऊन आवडे सरकारला असं म्हणत तिसऱ्या लाटेच्या शक्यता आणि राज्य सरकारच्या निर्बंधांवरून टोला लगावला होता.

आता काँग्रेसने मनसेसह भाजपला टोला लगावला आहे. ‘भाजपा व भाजपाचे ज्यांच्या मैत्रीचे नवनिर्माण करण्याचे प्रयत्न चालले आहेत त्यांचा मंदिराच्या, उत्सवांच्या नावाने राज्यात अराजक पसरवण्याचा प्रयत्न आहे. मोदी सरकारने महाराष्ट्रात ३ऱ्या लाटेत ६० लाख रुग्ण येतील म्हणत निर्बंधांचे निर्देश दिले. लॉकडाऊन आवडे मोदींना असे का म्हणत नाहीत?,’ असा खोचक सवाल काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी उपस्थित केला आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!