Share

‘मराठा समाजाचे प्रश्न ५ जुलै पर्यंत सोडवा अन्यथा…’ ; विनायक मेटेंचा इशारा

Published On: 

पुणे: राज्यात गेल्या काही दिवसांपासून मराठा आरक्षणचा मुद्दा चर्चेत आहे. सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण कायदा रद्द केल्यापासून पुन्हा एकदा हा मुद्दा चर्चेत आला आहे. न्यायालयाच्या निकालामुळे मराठा समाजात मोठी अस्वस्थता पाहायला मिळत आहे. तर शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे, खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्यासह भाजपने देखील आंदोलनाची हाक दिली आहे. सध्या भाजपचे नेते महाराष्ट्रातील विविध भागांमध्ये जाऊन मराठा आरक्षणाबाबतची भूमिका स्पष्ट करत आहेत.

दरम्यान आज पुण्यात शिवसंग्राम नेते विनायक मेटे यांनी पत्रकार परिषद घेऊन आरक्षणाबाबत राज्य सरकारला येणारे अधिवेशन चालू न देण्याचा इशारा दिला आहे. यावेळी बोलताना ते म्हणाले कि, ‘मराठा क्रांती मोर्चाच्या माध्यमातून राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात मेळावे किंवा मोर्चे घेण्याचा निर्धार केला असून ५ तारखेपासून सुरू केले आहेत. २७ जूनला मुबंईत १० हजार दुचाकी रॅली काढणार आहे. आता प्रत्येक जिल्ह्यात मराठा समाजाच्या मान्यवर लोकांशी चर्चा करणार त्यानंतर प्रत्येक जिल्ह्याच्या महसूल कार्यलयावर मोर्चे काढणार आहोत. त्यामुळे आता होणारे मोर्चे हे मूक मोर्चे नसतील तर बोलके असतील. त्यामुळे सरकारने 5 जुलै पर्यत सरकारने मराठा समाजाच्या बाबतचे प्रश्न नाही सोडवले नाही तर येणारे 7 तारखेला सुरू होणारे अधिवेशन चालू देणार नाही असा इशारा देण्यात आला आहे.

तसेच या सरकारचा रिमोट कंट्रोल म्हणून शरद पवारांकडे बघितलं जातं याबाबत बोलताना मेटे म्हणाले, ‘सत्तेचा बाहेर कोण मार्गदर्शन करते कोण रिमोट कंट्रोल याला महत्त्व नाही. मुख्यमंत्री बोलकी बाहुली आहेत का? त्यांना कोणाचा अडथळा असेल तर ते त्यांनी जाहीर करावं की मला आरक्षण द्यायची इच्छा आहे पण हे आडवे येत आहेत.या सरकार का मराठा समाजाचा बाबतीत काही देणं घेणं नाही. त्यांचा मनामध्ये पाप आहे हे स्पष्ट होत आहे.’असे ते यावेळी म्हणाले आहेत.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!