🕒 1 min read
गडचिरोली : आरक्षण हा खुळखुळा असून त्यावर आपली शक्ती खर्च घालत बसू नका. मराठा समाजातील दलाल नेत्यांपासून सावध राहा. हे नेते तुमच्यातील संघटित शक्तीला स्वतःच्या राजकीय स्वार्थासाठी वापरत आहेत, अशी भूमिका नक्षलवाद्यांनी मांडली आहे. एका पत्रकातून भारतीय कम्युनिस्ट पार्टी (माओवादी) यांनी आपली भूमिका छापून मराठा आरक्षणाच्या मुद्यावर नक्षलवाद्यांनी प्रथमच भाष्य केले आहे.
नक्षल्यांनी पत्रकात म्हटले आहे की, मराठ्यांना आरक्षणासाठी लढावे लागणे म्हणजे देशावरील कृषी संकटाचा भाग आहे. आरक्षण कोणत्याही समाजाला न्याय-समानता देऊ शकला नाही. काळाच्या ओघात जसे अन्य समाजीतील नागरिकांमध्ये बदल होत आहे तसे बदल मराठा समाजातही होत आहे. स्वत:च्या मेहनतीवर जगणारा शेतकरी समाज आज आरक्षणासाठी ओरडत आहे. ही समस्या म्हणजे देशीतील कृषी संकटाचेच लक्षण आहे. याला सरकारी धोरण जबाबदार, असेही पत्रात नमुद आहे.
सर्वच पक्षांच्या नेत्यांची नियत खोटी आहे. ते मराठा समाजाचे हीत कधीच साधणार नाही. त्यांचे गणित दोन बाबींवर अवलंबून असते. मराठा समाज त्यांना केवळ वोट बँकेसाठी पाहिजे आहे. महाराष्ट्राच्या सत्तेवर जास्तीत जास्त काळ मराठा समाजातून आलेले नेते मंडळी राहिली आहे. असे असतानाही मराठा समाजाची अशी अधोगती का झाली? असा प्रश्न नक्षल्यांनी विचारला आहे.
महत्वाच्या बातम्या
- वाघाच्या वादात भुजबळांची उडी, भाजपला म्हणाले, ‘वाघ पंजाही मारू शकतो!’
- ‘खा.नवनीत राणांना मिळालेल्या सर्व सुविधा गोठणार, आर्थिक लाभांचीही वसुली होणार’
- मी नेमकी कितवी पत्नी आहे हे सत्य लोकांसमोर येवू नये म्हणून माझ्यावर बंधने आणली गेली – करुणा मुंडे
- ‘धनंजय मुंडे हे माझे पती आहेत आणि मी माझ्या पतीच्या पैशातूनच समाजसेवा करत असते’
- श्रीलंका दौऱ्यासाठी निवड न झाल्याने निराश खेळाडूची भावनिक पोस्ट
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
