मुंबई : केंद्रीय मंत्रिमंडळात लवकरच फेरबदलांची शक्यता दिसू लागली आहे. पंतप्रधान मोदी-अमित शाह-जेपी नड्डा या तिघांच्या मॅरेथॉन बैठकीनंतर या चर्चेने वेग घेतला आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा जोर आता कमी झाला आहे आणि मोदींच्या मंत्रिमंडळ विस्तारासाठी यापेक्षा दुसरी चांगली वेळ असू शकत नाही असं राजकीय तज्ज्ञांचं म्हणणं आहे. संसदेचं पावसाळी अधिवेशन कोरोनामुळे काहीसं लांबलं तरी या अधिवेशनाआधी हा विस्तार होईल अशी दाट शक्यता आहे.
यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ‘केंद्राच्या किंवा उत्तरप्रदेशमधील मंत्रिमंडळात बदल होवो अथवा ना होवो उत्तरप्रदेशमध्ये परिवर्तन होणार हे जनतेने मनात पक्के केले आहे’, असे वक्तव्य मलिक यांनी केले.
ते म्हणाले, ‘केंद्र सरकारच्या मंत्रिमंडळात फेरबदल करण्याच्या बातम्यांनी जोर धरला आहे. फेरबदल करायचा की नाही हा अधिकार पंतप्रधानांचा आहे. उत्तरप्रदेशच्या मंत्रिमंडळात बदल योगीजी करोत अथवा ना करोत तोही त्यांचा अधिकार आहे. मात्र यावेळी जनतेने बदल करण्याचा विचार पक्का केला आहे’ असे नवाब मलिक यांनी म्हटले.
विरोधी पक्षांची एकजूट करण्याची पवारांची इच्छा
राष्ट्रवादी काँग्रेसची कोणतीही जबाबदारी राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर यांच्याकडे देण्यात आलेली नाही अशी माहिती नवाब मलिक यांनी शरद पवार आणि प्रशांत किशोर यांच्या भेटीबाबत दिली आहे. ‘प्रशांत किशोर हे राजकीय रणनीतीकार आहेत. त्यांचा वेगळा अनुभव आहे. तो अनुभव आणि देशात राजकीय परिस्थिती काय आहे याची माहिती प्रशांत किशोर यांनी शरद पवारांना दिली. देशातील सर्व विरोधी पक्षांची एकजूट करण्याची इच्छा पवारांची आहे आणि ती त्यांनी बोलून दाखवली आहे.’
महत्वाच्या बातम्या
- ‘बाळासाहेब असते तर विमानतळाला नाव नाकारले असते!’, भुजबळांचा शिवसेनेला सल्ला
- आरक्षणावर नक्षल्यांची भूमिका जाहीर, ‘मराठा समाजातील दलाल नेत्यांपासून सावध राहा!’
- वाघाच्या वादात भुजबळांची उडी, भाजपला म्हणाले, ‘वाघ पंजाही मारू शकतो!’
- ‘खा.नवनीत राणांना मिळालेल्या सर्व सुविधा गोठणार, आर्थिक लाभांचीही वसुली होणार’
- मी नेमकी कितवी पत्नी आहे हे सत्य लोकांसमोर येवू नये म्हणून माझ्यावर बंधने आणली गेली – करुणा मुंडे


