कोल्हापूर : भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यात वाघ शब्दावरुन चांगलीच जुंपल्याचं पाहायला मिळत आहे. दोन्ही नेते एकमेकांवर दोस्तीवरुन शाब्दीक कुस्ती करताना दिसत आहेत. आता, वाघ पिंजऱ्यात असो की जंगलात, तो वाघच असतो. हिंमत असेल तर वाघाशी मैत्री करायला पिंजऱ्यात या, महाराष्ट्रात वाघाचे राज्य आहे, असा टोला शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना काल लगावला होता.
यावर ‘किमान संजय राऊत यांनी हे मान्य केलं की त्यांचा वाघ हा पिंजऱ्यामध्ये आहे’, अशी टीका चंद्रकांत पाटील यांनी केली आहे. ते आज सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर या ठिकाणी बोलत होते. वाघावरून सुरू असलेल्या टीकेला संजय राऊत यांनी देखील प्रत्युत्तर दिलं होतं. मात्र आता संजय राऊत यांनीच शिवसेनेचा वाघ पिंजऱ्यात असल्याचे कबूल केले असा टोला पाटील यांनी लगावला आहे.
अजित पवारांनी यावेळीही ‘तेवढा’ जोर लावावा
मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून बोलताना चंद्रकांत यांनी सरकारवर जोरदार टीका केली. अजित पवार यांच्यासोबत आम्ही सरकार स्थापन केलं होतं. त्यावेळी इतका जोर लावला तसा जोर मराठा आरक्षणाच्या बाबतीत का लावला जात नाही, असा सवाल चंद्रकांत पाटील यांनी केला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळेपर्यंत ज्या सवलती देणे शक्य आहे ते देखील सरकार देत नाही. महाराष्ट्राचं वाटोळ या सरकारने लावलं आहे.
संभाजीराजेंनी सरकारची वाट लावावी
संभाजीराजे छत्रपती हे जरी मान्य करत नसते तरी ते ऑनपेपर भाजपचे खासदार आहेत, ते भाजपचे नेते आहेत. त्यांनी सरकारच्या निर्णयाची वाट पाहतो असं म्हणण्यापेक्षा वाट लावली पाहिजे. चालढकल करणं हे आम्हाला मान्य नाही. संभाजीराजे यांनी चालढकलपणा करू नये. आमदार आणि खासदार यांना जाब विचारून प्रश्न सुटणार आहे का? असे देखील यावेळी पाटील यावेळी म्हणाले.
महत्वाच्या बातम्या
- ‘केंद्रात काहीही होवो, युपीत भाजपचे सरकार जाणार हे निश्चित’, राष्ट्रवादीचा दावा
- ‘बाळासाहेब असते तर विमानतळाला नाव नाकारले असते!’, भुजबळांचा शिवसेनेला सल्ला
- आरक्षणावर नक्षल्यांची भूमिका जाहीर, ‘मराठा समाजातील दलाल नेत्यांपासून सावध राहा!’
- वाघाच्या वादात भुजबळांची उडी, भाजपला म्हणाले, ‘वाघ पंजाही मारू शकतो!’
- ‘खा.नवनीत राणांना मिळालेल्या सर्व सुविधा गोठणार, आर्थिक लाभांचीही वसुली होणार’


