Share

‘बाळासाहेब असते तर विमानतळाला नाव नाकारले असते!’, भुजबळांचा शिवसेनेला सल्ला

Published On: 

नाशिक : नवी मुंबई विमानतळाच्या नामकरणावरून बराच वाद सुरू आहे. बाळासाहेब ठाकरे असते, तर त्यांनी स्वत:चे नाव या विमानतळाला देण्यास नकार दिला असता. जे. आर. डी. टाटा यांचे नाव त्यांनी सुचवले असते. शिवसेनाप्रमुखांबरोबरच दी. बा. पाटील यांच्या नावालाही आमचा पाठिंबा आहेच; परंतु नामकरणाचा मुद्दा एकत्र बसून सोडवला पाहिजे, असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा छगन भुजबळ यांनी व्यक्त केले.

नवी मुंबई विमानतळाच्या वादावरून त्यांनी शिवसेनेला आस्तेकदमचा सल्ला दिला आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आज असते, तर त्यांनी नवी मुंबई विमानतळाला स्वत:चे नाव देण्यास नकार दिला असता, असेही भुजबळ यांनी सांगितले.

नाशिकसह राज्यात अनेक ठिकाणी कोरोना बळींच्या आकडेवारीत घोळ आहे. त्यामुळे कोरोना बळींची संख्या लपवली गेली की, यात काही घोळ आहे, याचा शोध घेणार असल्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी स्पष्ट केले आहे. यात नेमका काय घोळ आहे, नेमकी चूक कोणाची याची माहिती घेणार असल्याचे भुजबळांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.

वाघ पंजाही मारू शकतो
मोदींच्या भेटीबाबत शिवसेना मवाळ भूमिका घेत असल्याच्या प्रश्नाबाबत भुजबळ यांनी सावध प्रतिक्रिया दिली. राज्याचे अनेक प्रश्न केंद्राशी संबंधित आहेत. त्यामुळे जमवून घ्यावेच लागते; परंतु मैत्री करायची की नाही, हे वाघाच्या मनावर आहे. वेळ पडल्यास वाघ पंजाही मारू शकतो, असा टोला भुजबळ यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना लगावला.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!