🕒 1 min read
जळगाव : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दोन दिवसांपूर्वीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची दिल्लीत भेट घेतली. या दोन्ही नेत्यांमध्ये बंद दाराआड चर्चाही झाली. त्यामुळे ठाकरे-मोदी संबंध सुधारत असून त्याचा पर्यायाने भाजपलाच फायदा होणार असल्याचं चित्रं होतं. मात्र, राऊत यांच्या या विधानाने संबंध पुन्हा बिघडण्याची शक्यता आहे. ‘पाच वर्षे आम्ही फडणवीस सरकारमध्ये होतो. पण शिवसेनेला सत्तेत असूनही गुलामासारखी वागणूक मिळत होती’, असा दावा संजय राऊत यांनी केला आहे.
संजय राऊत हे उत्तर महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. आज त्यांनी जळगाव येथे शिवसेनेच्या मेळाव्याला मार्गदर्शन करताना हा खुलासा केला. ते म्हणाले, ‘राज्यात शिवसेना-भाजप युतीचं सरकार आलं. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले. पण गेल्या पाच वर्षात शिवसेना संपवण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न केला गेला. शिवसेना सत्तेत असतानाही गावोगावी शिवसेना संपवण्याचा प्रयत्न केला गेला. पाच वर्षे सत्तेत होतो. पण सत्तेत असूनही गुलाम होतो. गुलामासारखी वागणूक मिळत होती.’
प्रशांत किशोरांसोबत भेट ही मोठी उलथापालथ करणारी घटना
यावेळी त्यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आणि प्रशांत किशोर यांच्या भेटीसंदर्भातही भाष्य केले. प्रशांत किशोर हे कुठल्या राजकीय पक्षाचे नेते नाहीत. त्यांचे काम वेगळ्या प्रकारचे असते. त्यांना आम्ही सुद्धा अनेकदा भेटलो आहोत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पण भेटले आहेत. मागच्या निवडणुकीत त्यांनी आमच्यासाठी तसेच काँग्रेससाठी पण काम केले आहे.
ते एक प्रोफेशनल राजकीय रणनीतीकार आहेत. जर एखाद्या पक्षाचे प्रमुख नेते त्यांना भेटून चर्चा करत असतील तर ते त्यांच्या पक्ष कार्याविषयी, विस्ताराविषयी चर्चा केली असेल, असं सांगतानाच प्रशांत किशोर आणि शरद पवारांची भेट ही राजकारणातील मोठी उलथापालथ करणारी घटना आहे, असं सूचक विधानही त्यांनी केलं.
महत्वाच्या बातम्या
- ‘यांचे म्हणजे… नाचता येईना अंगण वाकडं!’, प्रविण दरेकरांचा शिवसेनेला टोला
- ‘चला, राऊतांनी हे मान्य तर केलं की त्यांचा वाघ पिंजऱ्यात आहे!’, चंद्रकांत पाटलांचा पलटवार
- ‘केंद्रात काहीही होवो, युपीत भाजपचे सरकार जाणार हे निश्चित’, राष्ट्रवादीचा दावा
- ‘बाळासाहेब असते तर विमानतळाला नाव नाकारले असते!’, भुजबळांचा शिवसेनेला सल्ला
- आरक्षणावर नक्षल्यांची भूमिका जाहीर, ‘मराठा समाजातील दलाल नेत्यांपासून सावध राहा!’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
