सोलापूर: सोलापूर जिल्हा परिषदेचे शिक्षक रणजितसिंह डिसले (Ranjitsingh Disale) यांना अनेक मोठ-मोठे पुरस्कार मिळाले आहेत. युनेस्को व लंडनस्थित वार्की फाउंडेशन यांच्या वतीने दिला जाणारा ग्लोबल टीचर प्राइज (Global Teacher Prize) या पुरस्काराने रणजितसिंह डिसले यांचे नाव जगभर झाले होते. आता अशातच त्यांना आणखी एका पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. हा पुरस्कार अमेरिकेतील प्रतिष्ठित पुरस्कारांपैकी एक मानला जातो.
रणजितसिंह डिसले यांना अमेरिकन सरकारकडून दिली जाणारी प्रतिष्ठित फुलब्राईट स्कॉलरशीप (fulbright scholarship) जाहीर झाली आहे. यावर्षी जगभरातील ४० शिक्षकांना ही प्रतिष्ठेची स्कॉलरशीप जाहीर करण्यात आली आहे. पीस इन एज्युकेशन (Peace in education) या विषयावर अमेरिकेतील विद्यापीठात अधिक संशोधन करण्यासाठी त्यांना ही स्कॉलरशीप जाहीर करण्यात आली आहे.
जगभरातील प्रतिभावान शिक्षकांना एकत्र आणून जगातील सर्वोत्तम विद्यापीठात शैक्षणिक संशोधन करण्याची संधी यामुळे मिळते. अमेरिकेतील शिक्षणपद्धती जवळून अभ्यासण्याची संधी यामुळे मिळते. ही शिष्यवृत्ती अमेरिकन सरकारडून दिली जात असून यंदाचे हे ७५ वे वर्ष आहे.
महत्वाच्या बातम्या:
- ‘फॅड्री’ फेम राजेश्वरी खरातची बॉलिवूडमध्ये एंट्री!
- बिहारच्या मुख्यमंत्र्यांची महिला आमदारावर आक्षेपार्ह टिप्पणी; तुम्ही खूप सुंदर दिसता, पण…
- ‘काँग्रेसशिवाय देशातील विरोधकांची मोट बांधणं अशक्य, नेतृत्व सामूहिक असेल’
- देवेंद्र फडणवीसांनी साहित्य संमेलनाला न जाण्यामागचं कारण केलं स्पष्ट
- …पण सरकारनं दोन पावलं पुढे यायला हवं- देवेंद्र फडणवीस
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

