Share

…पण सरकारनं दोन पावलं पुढे यायला हवं- देवेंद्र फडणवीस

Published On: 

औरंगाबाद : एसटीचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण या प्रमुख मागण्यांसाठी एसटी कर्मचारी आक्रमक झाले आहेत. (MSRTC Strike) तसेच काही दिवसांपूर्वी परिवहन मंत्री अनिल परब(Anil Parab) यांनी पगार वाढीचा निर्णय जाहीर केल्यानंतर एसटी कर्मचाऱ्यांनी कामावर हजर रहाण्याचे आवाहन केले आहे. परंतु त्यानंतरही अनेक कर्मचारी विलीनीकरणाच्या मागणीसाठी अडून बसले असून कामावर येण्यास तयार नाहीत. या पार्श्वभूमीवर आता राज्य सरकार संपकरी एसटी कर्मचाऱ्यांवर मेस्मा कायद्यांतर्गत कारवाईची भूमिका घेण्याचा विचार करत असताना राज्याचे विधानसभा विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस(Devendra Fadanvis) यांनी यासंदर्भात राज्य सरकारवर टीका केली आहे.

औरंगाबादमध्ये एका कार्यक्रमात बोलत असतांना फडणवीस म्हणाले की,’एसटी कर्मचाऱ्यांच्या संदर्भात सरकराची भूमिका लोकशाहीविरोधी आहे. मार्ग काढण्याचा कोणताही प्रयत्न सरकारकडून होत नाहीये. विरोधी पक्ष म्हणून आम्ही भरपूर सहकार्य सरकारला केलं. पण सरकारनं दोन पावलं पुढे यायला हवं, ते सरकार येत नाही.’ तसेच काल मला माहिती मिळाली की एक उपोषणकर्ता कर्मचाऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे. सरकारच्या संवेदना हरवल्या आहेत. असंवेदनशीलतेचा कळस आहे. अजूनही वेळ गेलेली नाही. मेस्मा लावण्याऐवजी सरकारने चर्चेतून मार्ग काढावा’, असेही ते म्हणाले.

दरम्यान, यासंदर्भात माध्यमांशी संवाद साधतांना परिवहन मंत्री अनिल परब म्हणाले होते की,’एसटीच्या इतिहासात कधी मिळाली नसेल एवढी म्हणजे ४१ टक्के वाढ सरकारने दिली. यामुळे १० वर्षे ते ३० वर्षे सेवा करणाऱ्या कर्मचाऱ्यांना २४ हजार ते ५६ हजार रुपये वेतन मिळणार आहे. तसेच न्यायालयाच्या अधीन राहून नियुक्त समितीच्या शिफारशीनुसार विलिनीकरणाचा निर्णय घेण्यात येणार आहे. त्यामुळे संप तात्काळ मागे घ्यावा.’

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!