पटणा: बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार (Nitish Kumar) यांनी नेत्यांच्या बैठकीदरम्यान महिला भाजपा आमदारावर केलेल्या एका टिप्पणीमुळे सध्या ते वादात सापडले आहे. २९ नोव्हेंबर रोजी मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या अध्यक्षतेखाली विधिमंडळाची बैठक झाली. यामध्ये भाजपा, जेडीयूसह (JDU) अन्य काही पक्षांचे आमदार सहभागी झाले होते. या बैठकीदरम्यान अनेक महत्त्वाच्या विषयांवर चर्चा झाली.
या बैठकीत बिहारमधल्या एकमेव आदिवासींसाठी राखीव असलेल्या जागेवर निवडून आलेल्या भाजप आमदार निक्की हेम्ब्रम (Nikki Hembrom) यांनीही आपला मुद्दा मांडला. आदिवासींना आपल्या उदरनिर्वाहासाठी ‘महुआ’ गोळा करणं आणि त्याची साठवणूक करण्याला परवानगी देण्याची मागणी या बैठकीत निक्की हेम्ब्रम यांनी केली आहे. त्यांनी केलेल्या या मागणी नंतर मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी त्यावर बोलताना आक्षेपार्ह वक्तव्य केले.
भाजप आमदार हेम्ब्रम यांनी केलेल्या मागणीला उत्तर देताना नितीश कुमार म्हणाले, तुम्ही खूप सुंदर दिसता पण तुमचे विचार मात्र पूर्णतः वेगळे आहेत. तुम्हाला माहित आहे का की आम्ही अनुसूचित जाती-जमातींसाठी काय काय केलं आहे? तुम्ही तुमच्या विधानसभा क्षेत्रात जात नाही. मुख्यमंत्री नितीश कुमार असं म्हणताच बैठकीला उपस्थित असलेले सर्वजण हसू लागले, मात्र निक्की हेम्ब्रम यांना मात्र अवघडल्यासारखं झालं. अखेर आमदार हेम्ब्रम यांनी या प्रकरणी भाजप पक्षातील वरिष्ठांकडे तक्रार केली असल्याची माहिती आमदार निक्की हेम्ब्रम यांनी दिली आहे.
महत्वाच्या बातम्या:
- देवेंद्र फडणवीसांनी साहित्य संमेलनाला न जाण्यामागचं कारण केलं स्पष्ट
- …पण सरकारनं दोन पावलं पुढे यायला हवं- देवेंद्र फडणवीस
- तुमच्या नावाने मुस्लिमांना घाबरवलं जातं; योगी आदित्यनाथ म्हणतात…
- किरीट सोमय्या यांचा ‘या’ शिवसेना नगरसेवकावर मनी लाँड्रींगचा आरोप
- अखेर कंगना शेतकऱ्यांपुढे झुकली; माफी मागितल्याने वातावरण जल्लोषमय!
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

