Share

‘फॅड्री’ फेम राजेश्वरी खरातची बॉलिवूडमध्ये एंट्री!

Published On: 

मुंबई : नागराज मंजुळे (Nagraj Manjule) दिग्दर्शित ‘फॅड्री’ (Fandry) मराठी चित्रपटातील ‘शालु’ म्हणचे राजेश्वरी खरात (Rajeshwari Kharat). राजेश्वरी आता बॉलिवूडमध्ये पदार्पण करतेय. तिच्या आगामी हिंदी चित्रपटाची घोषणा नुकतीच करण्यात आली आहे. ती नेहमीच सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. ती चाहत्यांसाठी वेगवेगळे फोटो आणि व्हिडीओ नेहमीच शेअर करत संपर्क साधत असते.

लवकरच ‘पुणे टू गोवा’ या बॉलिवूड चित्रपटात राजेश्वरी झळकणार आहे. अमोल भगत या चित्रपटाचे दिग्दर्शन (Amol Bhagat is directing ) करत आहे. हा एक कॉमेडी चित्रपट असणार आहे. कथा विनोदी शैलीची असली तरी, यात थ्रीलर आणि सस्पेन्सही पाहायला मिळणार असल्याचे कळते आहे. ‘पुणे ते गोवा’ (‘Pune to Goa’) या रोमांचक प्रवासावर आधारित या चित्रपटाची कथा असणार आहे. मराठमोळ्या शालूची आता बॉलिवूडमध्ये एंट्री होणार असून हिंदीतही ती अभिनयाचा जलवा दाखवणार आहे.

https://www.instagram.com/p/CXBiLabtCdM/?utm_medium=copy_link

अभिनेत्री राजेश्वरीने आपल्या अभिनयाने रसिकांच्या मनावर राज्य केले असून तिने ‘फँड्री’ चित्रपटात उत्कृष्ट भूमिका साकारली होती. तिने ‘शालू’ चे पात्र अविस्मरणीय बनवण्यासाठी मेहनत घेतली होती. आता मात्र बॉलिवूडमध्ये पदार्पण करून हिंदीतही आपल्या अभिनय करण्यास सज्ज झाली आहे. आगामी तिच्या या चित्रपटासाठी चाहत्यांनी तिला सोशल मीडियावर देखील कौतूक करत आहेत.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!