🕒 1 min read
कोलकाता: कोलकात्यातील पुस्तक प्रदर्शनात एका अभिनेत्रीला पर्स चोरताना पकडण्यात आल्याने एकच गोंधळ उडाला होता. कोलकाता पोलिसांनी सांगितले की, अभिनेत्री रूपा दत्ता हिला लोकांचे लक्ष दुसरीकडे वेधून, चोरी केल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. ही खळबळजनक घटना आंतरराष्ट्रीय कोलकाता बुक फेअर दरम्यान घडली. एका टीव्ही शोमध्ये काम करणाऱ्या रूपा दत्ता हिला शनिवारी पोलिसांनी रिकामी पर्स कचऱ्याच्या डब्यात फेकताना पाहिल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. बिदन नगर उत्तर पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्याने ही माहिती दिली.
यानंतर पोलिसांनी तिला ताब्यात घेतले आणि तिची चौकशी करण्यात अली. तिची झडती घेतली असता एका बॅग मध्ये अनेक पर्स आणि ७५ हजारांची रोकड जप्त करण्यात आली. यानंतर रुपाला इतरांचे लक्ष विचलित करून (केपमारी) केलेल्या चोरीच्या गुन्ह्यात अटक करण्यात आली. या गुन्ह्यात रूपासोबत आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा तपास पोलीस करत आहेत.
रुपा दत्ता याआधीही चर्चेत आली होती. जेव्हा तिने चित्रपट निर्माते अनुराग कश्यप यांच्यावर लैंगिक छळाचे आरोप केले होते. तिने सोशल मीडियावर एका व्यक्तीसोबत झालेल्या संभाषणाचे स्क्रीनशॉट शेअर केले होते. त्यात प्रसिद्ध चित्रपट निर्माता दिग्दर्शकाचे केवळ नाव होते. मात्र, या प्रकरणाच्या तपासात पोलिसांना ठोस पुरावे मिळाले नाहीत. आता रूपाला अटक केली असून तिला लवकरच न्यायालयात हजर केले जाईल. त्यानंतर तिला न्यायालयीन कोठडी किंवा जामिनावर सोडण्याचा निर्णय घेतला जाईल.
महत्वाच्या बातम्या:
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
