दिल्ली: शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी नितेश आणि निलेश राणे यांनी शरद पवार यांच्याबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली. यावर त्यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi)आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना सवाल केला.
राज्यात राजकीय मतभेद असू शकतात. मात्र जी भाषा शरद पवार यांच्याबद्दल वापरली जाते ती अत्यंत खालच्या स्तरावरची आहे. आम्ही काही बोललो तर आम्हाला पवारांचे चेले म्हणतात. हो आहे मी त्यांचा चेला. पण तुम्हाला अशी असंसदीय भाषा वापरणं शोभतं का? असा सवाल संजय राऊत यांनी केला आहे.
तसेच शरद पवार (Sharad Pawar) यांच्याबद्दल राणे पुत्र बोलतात हे देवेंद्र फडणवीस, पंतप्रधान मोदी यांना मान्य आहे का? असा सवाल करत जर त्यांना हे मान्य नसेल तर त्यांनी बोलायला हवं. असं राऊत यांनी म्हटले आहे.
महत्वाच्या बातम्या:
“या” प्रसिद्ध अभिनेत्रीला पर्स चोरताना पकडले; पोलिसांकडून अटक
“आम्ही सरकारच्या दबावाला भीक घालत नाही”, प्रविण दरेकरांचा हल्लाबोल
बारावीचा केमिस्ट्री विषयाचा पेपर फुटलाच नाही; शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांचे स्पष्टीकरण
IPL 2022: नेट सेशन मध्ये धोनीची धमाकेदार फटकेबाजी; चाहत्यांना आठवला ‘विंटेज माही’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

