Share

“आम्ही सरकारच्या दबावाला भीक घालत नाही”, प्रविण दरेकरांचा हल्लाबोल

Published On: 

🕒 1 min read

पिंपरी : काही दिवसांपूर्वी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी विधानसभा अध्यक्ष्यांना राज्य सरकारच्या षडयंत्राचे पुरावे असलेला पेनड्राईव्ह दिला होता. त्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आल्याचे बघायला मिळाले. तद्पश्चात फडणवीसांना पोलिसांनी नोटीस पाठवली. तसेच याप्रकरणी काल(१३ मार्च) मुंबईच्या सायबर पोलिसांनी फडणवीसांचा दोन तास जबाब नोंदवला. याच मुद्द्यावरून आता विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर (Pravin Darekar) यांनी महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधत टीकास्त्रांचा वर्षाव केला आहे. तसेच आम्ही सरकारच्या दबावाला भीक घालत नाही, असेही दरेकर म्हणाले आहेत.

यासंदर्भात प्रसार माध्यमांशी संवाद साधत असतांना प्रविण दरेकर म्हणाले की,‘राज्यातील मविआ सरकारच्या पायाखालची वाळू घसरली असून देवेंद्र फडणवीस सरकारचा पिच्छा सोडत नाही, हे लक्षात आल्याने हतबल झालेल्या राज्य सरकारकडून फडणवीस यांना नोटीस बजावण्यात आली आहे.’तसेच आम्ही सरकारच्या दबावाला भीक घालत नाही. जेवढी दंडेलशाही करण्याचा प्रयत्न कराल, तेवढी भाजप कार्यकर्ते उसळी मारतील, असेही दरेकर म्हणाले आहेत.

दरम्यान, सरकारच्या तलवारीला धार नाही, याचे भान सरकारला उरले नाही, असा घणाघातही प्रविण दरेकर यांनी केला आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!