🕒 1 min read
मुंबई: आयपीएल २०२२ २६ मार्चपासून सुरू होणार आहे आणि त्याआधी धोनीने जोरदार तयारी सुरू केली आहे. गेल्या काही दिवसांपासून त्याच्या सरावाशी संबंधित छायाचित्रे आणि व्हिडिओ सातत्याने समोर येत आहेत. ज्यामध्ये कधी माही कुणाला फलंदाजी शिकवत आहे तर कधी स्वत: धावांचा पाऊस पाडत आहे. दरम्यान, त्याचा आणखी एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्याला पाहून चाहत्यांना विंटेज धोनी आठवला आहे.
IPLच्या १५ व्या हंगामाला सुरुवात होण्यास फक्त २ आठवडे उरले असून सर्व संघांनी सराव सुरू केला आहे. सर्वप्रथम, नेहमीप्रमाणे सीएसके संघाने सुरतमध्ये आपला तळ ठोकला होता. यासोबतच संघाशी संबंधित सर्व खेळाडूंना शिबिरात सहभागी होण्यास सांगण्यात आले. चेन्नईचा संघ सुरतमध्ये तयारी करण्यात व्यस्त आहे. अलीकडेच चेन्नई सुपर किंग्सने त्यांच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवरून एक व्हिडिओ शेअर केला आहे ज्यामध्ये माही (MS Dhoni) लांब षटकार मारताना दिसत आहे. कॅप्टन कूलने हा गगनचुंबी षटकार आपल्या नेहमीच्या स्टाईलने मारला आहे.
????: SH????T MAcHI! One for the fam back home! ????#WhistlePodu #Yellove ???? @msdhoni pic.twitter.com/fOAc5QECZT
— Chennai Super Kings (@ChennaiIPL) March 13, 2022
एमएस धोनीच्या बॅटमधून बाहेर पडलेला हा षटकार अगदी सरळ होता, ज्याने चाहत्यांना त्याच्या जुन्या दिवसांच्या शॉट्सची आठवण करून दिली. गेल्या वर्षी चौथ्यांदा विजेतेपद पटकावणारा CSK गतवर्षीच्या उपविजेत्या कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध २६ मार्च रोजी स्पर्धेच्या पहिल्या सामन्यात आपल्या मोहिमेची सुरुवात करेल. अशा परिस्थितीत पुन्हा एकदा माही मैदानावर त्याच जुन्या स्टाईलमध्ये दिसावे, अशी चाहत्यांची अपेक्षा आहे.
महत्वाच्या बातम्या
- काँग्रेस कार्यकारिणीची बैठक संपन्न; संघटना मजबूत करण्यासंबंधी चर्चा
- “…करमाफी करंटे ठाकरे सरकार देणार नाही”, भातखळकरांचा टोला
- जखमा तलवारीनेच होतात असे नाही, कधी कधी पेन ड्राईव्ह सुद्धा…- अतुल भातखळकर
- IPL 2022: आयपीएलमध्ये गोलंदाजीबद्दल हार्दिक पंड्याने केला खुलासा; म्हणाला…
- “गोव्यात कधीच पक्ष जिंकत नाही तर…”, संजय राऊतांची प्रतिक्रिया
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
