Share

‘मी स्वतःला खूप नशीबवान समजतो..’; अर्जुन कपूरने व्यक्त केली भावना

Published On: 

मुंबई : अभिनेता अर्जुन कपूर याने अनेक  चित्र पटांमध्ये काम केल आहे. कोरोंना काळात देखील तो आपल्या चाहत्यांसाठी त्याचा नवीन चित्रपट घेऊन येत असल्याचे सांगितले होते.  त्यानंतर अर्जुनच्या  ‘सरदार ग्रॅंडसन’ या चित्रपटाची अनेकजण वाट पाहत होते. नुकताच हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्सवर प्रदर्शित करण्यात आलाय. हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर चित्रपटाबद्दल बोलताना ‘सरदार का ग्रॅंडसन’ हा त्याच्या ह्रदयाजवळचा चित्रपट असल्याचे त्याने सांगितलं. कारण हा चित्रपट त्याच्या आजींसाठी आहे.

https://www.instagram.com/p/CPAK_pXJEqi/?utm_source=ig_embed&ig_rid=7e6812c6-ce38-45da-9eff-d42ac6a62875

अर्जुन कपूरने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत  त्याने चित्रपटासोबत जोडल्या गेलेल्या भावना व्यक्त केल्या आहेत.  या चित्रपटात ‘सरदार’ ही त्याच्या आजींसारखीच मिळती-जुळती असल्याचं अर्जुन कपूर म्हणाला. अर्जुन कपूरने लिहिलं की, “मी स्वतःला खूप नशीबवान समजतो, मला नेहमी असेच चित्रपट मिळतात ज्याच्या माध्यमातून मी माझं लहानपण आणि जगण्याचा अनुभव घेऊ शकतो…मग तो ‘की अॅंड का’ असो जो माझ्या आईंसाठी होता, किंवा मग आताचा ‘सरदार का ग्रॅंडसन’ असो जो माझ्या आजींसाठी आहे… हे ते चित्रपट आहेत जे माझ्या आत्म्यासोबत जोडले गेले आहेत आणि माझे आवडते चित्रपट आहेत… ‘सरदार का ग्रॅंडसन’ या चित्रपटाचा मी खूप आभारी आहे, यानिमित्ताने मला दिग्दर्शक काश्वी नायर यांच्यासोबत काम करण्याची संधी मिळाली…माझी पहिली महिला दिग्दर्शक…ज्यांची स्वतःची ही पहिली फिचर फिल्म आहे…काश्वी, तु मला अशा चित्रपटात काम करण्याची संधी दिली, ज्याचा मला गर्व वाटतो.”

यापुढे बोलताना अर्जुन कपूर म्हणाला, “या चित्रपटात काम करून मला खूप आनंद होतोय…या चित्रपटात काम करताना मला आजींसोबतचे अविस्मरणीय क्षण जगता आले जे मला माझ्या लहानपणी मिळाले नाही..”. यासोबतच त्याने त्याच्या चाहत्यांना हा चित्रपट आवर्जून पाहण्याचं आवाहन देखील केलंय. हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर त्याने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आणि या चित्रपटासाठी दिग्दर्शक काश्वी नायर यांचे आभार मानले. अभिनेता अर्जुन कपूर सध्या त्याच्या ‘सरदार का ग्रॅंडसन’ या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!