मुंबई : मराठी चित्रपटातील ‘फँड्री’ सिनेमातील शालू ही भूमिका साकारणारी अभिनेत्री राजेश्वरी खरात सध्या चांगलीच चर्चेत आली आहे. फँड्री या चित्रपटातील भूमिकेपपेक्षा खऱ्या आयुष्यात ती राजेश्वरी प्रचंड ग्लॅमरस आहे. सोशल मीडियावर ती प्रचंड सक्रीय असते. सोशल मीडियावर ती तिचे हटके अंदाजातील फोटो पोस्ट करत असत. तिच्या प्रत्येक अंदाजातील फोटों चाहत्यांच्या भरभरून लाईक्स आणि कमेंट्स असतात. तिच्या प्रत्येक फोटोची सोशल मिडियावर चर्चा होत असते.
https://www.instagram.com/p/COzOSMXpVYO/?utm_medium=copy_link
काही दिवसांपूर्वी राजेश्वरीने आपल्या अधिकृत फेसबुक अकाउंटवर एक पोस्ट शेअर केली होती. राजेश्वरी खरातच्या फोटो आणि व्हिडीओवर कमेंट्सचा महापूर येतो. राजेश्वरीच्या लूक्सचं कौतुक करणाऱ्या चारोळ्याही त्यामध्ये असतात. विशेष म्हणजे त्यापैकी काही कमेंट्सना राजेश्वरी स्वतः उत्तरही देते. त्यामुळे तिचं लक्ष वेधून घेण्यासाठी चाहत्यांमध्ये रंगलेली असते. चाहते आपल्या लाडक्या शालूचे फोटोही मोठ्या प्रमाणावर स्वतःच्या वॉलवर शेअर करतात.
राजेश्वरीच्या फोटोला अनेक युजर्सने कमेंटवर संमिश्र प्रतिक्रिया दिल्या, एका युजर्सने तिला घमंडी असल्याचे म्हटल होत त्यावर अभिनेत्री राजेश्वरीने युजरला प्रत्युत्तर देत केलेल्या विनंतीने सर्वांचे लक्ष वेधले. राजेश्वरीने म्हणाली की, ‘हे रेकोर्डवरुन काढून टाका अध्यक्ष महोदय.’ तिचा प्रत्युत्तर देण्याचा हा अंदाज चाहत्यांना फारच भावला आहे. राजेश्वरीच्या मजेशीर कमेंटने अनेक जण प्रतिक्रिया देत आहेत.
https://www.instagram.com/p/COvF-Typ432/
राजेश्वरीने ‘फँड्री’ नंतर ‘आयटमगिरी’ या चित्रपटात काम केले. परंतु, तो चित्रपटही फार कमाल दाखवू शकला नाही. त्यानंतर ती कोणत्याही चित्रपटात दिसली नाही. मात्र इतक्या काळानंतर ती बदलेल्या अंदाजात पुन्हा एकदा रसिक प्रेक्षकांसमोर आली आहे. तिचे चित्रपट नसले तरी ती सोशल मिडियावरून चाहत्यांच्या संपर्कात राहत असते, तीचा चाहता वर्ग देखील मोठा आहे.
महत्वाच्या बातम्या
- ‘मराठा आंदोलकांच्या खांद्याला खांदा लावून सहभागी होईल’, आ. राणाजगजितसिंह यांची माहिती
- आमदार निवासासाठी ९०० कोटी रुपये खर्च करण्याऐवजी हा पैसा सामान्यांसाठी वापरा : करुणा मुंडे
- बोगस ‘ई-पास’ बनवणाऱ्या तिघांना अटक; उस्मानाबाद पोलिसांची कारवाई
- ‘लसीकरण पूर्ण झाल्यावर आपण कोरोनाची तिसरी लाट नक्की रोखू शकू’, सुप्रिया सुळे यांचे मत
- वीरु धावला कोरोनापीडीतांसाठी, सुरु केली ‘राहत की सास’; गरजुंना मिळणार मोफत ऑक्सिजन
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

