Share

‘तर मग शेतकऱ्यांचे पैसे बुडवणाऱ्या पाचपुतेंची चौकशी का होत नाही ?’

Published On: 

टीम महाराष्ट्र देशा : कोहिनूर स्क्वेअर मिल कर्ज प्रकरणातील अनियमिततेबाबत आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची ईडीकडून चौकशी सुरु आहे. राज ठाकरे यांची ईडी कडून होणारी चौकशी ही केवळ राजकीय वैर असल्याचं अनेक नेत्यांकडून सांगण्यात येत आहे. तर राज ठाकरे यांच्या पाठीशी भाजप विरोधी पक्ष उभे राहिलेत. भाजप पक्ष सत्तेचा वापर करूनच विरोधी नेत्यांना त्रास देत असल्याची टीका केली जात आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी देखील विरोधकांच्या सुरात सूर मिसळवला आहे.

सत्तधारी पक्ष आपल्या सत्तेचा वापर करूनचं विरोधकांना त्रास देत आहे. भाजपच्या अनेक नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप आहेत. त्यांची ईडीची चौकशी का होत नाही ? श्रीगोंदा तालुक्याचे माजी आमदार आणि भाजपचे नेते बबनराव पाचपुते यांनी अनेक शेतकऱ्यांचे पैसे बुडवले आहेत. शेतकऱ्यांचे कोट्यावधी रुपये बुडवले आहेत. मात्र त्यांची चौकशी होत नाही, असे म्हणत राजू शेट्टी यांनी ईडीच्या निष्पक्षतेवर शंका व्यक्त केली आहे.

दरम्यान राज ठाकरे यांच्या चौकशीवरून विरोधाकांनी सत्ताधारी भाजपला लक्ष केले आहे. राज ठाकरे यांना ईडीची नोटीस पाठवून सरकार नीच राजकारण करत असल्याची टीका विधान परिषदेचे विरोधीपक्ष नेते धनंजय मुंडे यांनी केली आहे. तर भाजप आपल्या सत्तेचा वापरकरून सरकार विरोधी नेत्यांना त्रास देत असल्याची टीका समाजमाध्यमांतून होत आहे.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!