टीम महाराष्ट्र देशा : कोहिनूर स्क्वेअर प्रकरणी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना ईडीने नोटीस बजावली आहे. तसेच त्यांना गुरुवारी २२ ऑगस्ट रोजी चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे ऐन विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरेंच्या अडचणी वाढल्या आहेत.
याच पार्श्वभूमीवर ठाण्यात धक्कादायक प्रकार समोर आला आहे. प्रवीण चौगुले नावाच्या एका तरुणानं स्वत:ला जाळून घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार मंगळवारी रात्री उशीरा ठाण्यात घडला. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना ईडीनं नोटीस पाठवल्यामुळे आपण आत्महत्या करत आहोत असं सांगून प्रवीणनं आत्महत्या केली असल्याचं त्याच्या मित्रांचं म्हणणं आहे.
दरम्यान, गेले 2 दिवस राज ठाकरे यांना ईडीची नोटीस आली आहे आणि त्यांना चौकशीला सामोरं जावं लागणार. यामुळे आपण दुःखावलो असून आत्महत्या करतोय असं वारंवार प्रवीण त्याच्या मित्रांना सांगायचा. एवढंच नाही तर मंगळवारी दिवसभर प्रविणने राज ठाकरे यांच्या समर्थनात आणि ईडी विरोधात अपशब्द वापरुन शंभर पेक्षा जास्त फेसबुक पोस्ट केल्या आहेत. पण पोलिसांकडून अद्याप दुजोरा देण्यात आलेला नसून पोलीस तपास सुरू आहे.
महत्वाच्या बातम्या
‘जन आशीर्वाद यात्रे’ला पुन्हा सुरवात, यात्रेच्या समारोप सभेला पंतप्रधान मोदी उपस्थितीत राहण्याची शक्यता
मी बाळासाहेबांकडे परत गेलो असतो तर उद्धव घर सोडणार होते : नारायण राणे
सत्ता आल्यावर सत्ताधाऱ्यांना पळता भूई थोडी करू : धनंजय मुंडे
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

