पुणे : कोरोनाच्या पहिल्या लाटेच्या तुलनेत दुसऱ्या लाटेत अधिक रुग्ण नोंदवले जात आहेत. दरम्यान, पुणे शहरात एप्रिल महिन्यात दररोज पाच ते सात हजार रुग्णांची वाढ होत होती. यामुळे पुणे शहरासह जिल्ह्यासाठी देखील ही बाब गंभीर होती. यानंतर कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने घसरल्यामुळे काहीसा दिलासा मिळाला.
परंतु सध्या अत्यावश्यक सेवा वगळता पुण्यात शनिवार रविवार दुकाने राहणार बंद राहणार आहेत. तर सोमवार ते शुक्रवारपर्यंत सर्व सुरु राहिल. पुढील आठवड्यातही हीच परिस्थिती राहणार आहे.परंतु कोरोना परिस्थिती काही दिवसांत नियंत्रणात आलीच तर या नियमांमध्ये बदल केला जाणार आहे. असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज जाहीर केले.
महाराष्ट्रात कोरोना रुग्णसंख्या कमी होत असली तरी रायगड, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, बीड, उस्मानाबाद, कोल्हापूर तर काही प्रमाणात पुण्यातही कोरोना रुग्णसंख्या कमी होत नाही. शनिवार, रविवार महाबळेश्वर, खंडाळा, लोणावळा, खोपोलीत नागरिकांची प्रचंड प्रमाणात गर्दी असते. परंतु नागरिकांना कोरोनाची स्थिती गांभीर्याने घेण्याची गरज आहे. राज्याबाहेर जाणाऱ्यांची संख्याही मोठ्या प्रमाणात वाढत आहे. यात पुण्यातूनही नागरिक देवदर्शन, ट्रेकिंगच्या निमित्ताने बाहेर पडत आहेत अशा लोकांना पुन्हा पुण्यात आल्यास १५ दिवस क्वारंटाईन केले जाणार असून तसेच आदेशही काढले जातील.असा इशाराही त्यांनी दिला.
नागरिक ज्या प्रमाणात बाहेर पडत आहेत ते लक्षात घेता जिल्ह्याबाहेर पडणाऱ्या लोकांना 15 दिवसांचे विलगिकरण बंधनकारक करण्याचा विचार सुरू असल्याचे यावेळी अजित पवारांनी सांगितले. पुण्यामध्ये आज कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी अजित पवारांनी बैठक घेतली त्यानंतर त्यांनी ही माहिती दिली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘तुम्हाला मी कधीच विसरू शकणार नाही’ ; विराटने शेअर केली भावुक पोस्ट
- बीडमध्ये सध्या आंदोलनाचे वारे; आता २१ जूनला ‘रास्ता रोको’
- ‘१२ वी नापास पण टीका करण्यात अव्वल’ ; केआरकेने पुन्हा एकदा साधला कंगनावर निशाणा
- पहिल्या दिवशी वरुणदेवाने बॅटिंग केल्यामुळे खेळ वाया; दुसऱ्या दिवशीही पावसाची शक्यता
- ‘आम्ही एक महान खेळाडू गमावून बसलो’ ; मोदींनी व्यक्त केल्या भावना


