इंग्लंड : फ्लाईंग सिख म्हणून ओळख असलेले दिग्गज धावपटु मिल्खा सिंग यांचे निधन झाले आहे. वयाच्या ९१व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. काही दिवसापुर्वी त्यांना कोरोनाची लागण झाली होती. उपचारादरम्यान त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे रुग्णालयातून सांगण्यात आले होते. पण मात्र अखेर कोरोनाविरुद्धच्या लढ्यात त्यांची हार झाली. त्यांच्या निधनानंतर अनेक मान्यवरांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.
टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीने देखील श्रद्धांजली अर्पण केली आहे. विराटने ट्विटर वर मिल्खा सिंग यांचा एक फोटो शेअर केला आहे. फोटो शेअर करत विराटने लिहिले, तुम्हला कधीच विसरू शकणार नाही’ अशी भावनिक पोस्ट शेअर करत विराटने श्रद्धांजली वाहीली आहे.
A legacy that inspired a whole nation to aim for excellence. To never give up and chase your dreams. Rest in Peace #MilkhaSingh ji ????. You will never be forgotten. pic.twitter.com/IXVmM86Hiv
— Virat Kohli (@imVkohli) June 19, 2021
मिल्खा सिंग यांनी तब्बल चार वेळा आशियाई स्पर्धेत भारताला सुवर्ण पदक मिळवून दिले होते. १९६० साली रोम येथे झालेल्या ऑलिम्पिंक स्पर्धेत त्यांनी ४०० मीटर शर्यत ४५.६ सेकंदात पूर्ण केली होती. यापुर्वी १९५६ मध्ये आशियाई स्पर्धेत २०० मीटर आणि ४०० मीटर धावण्याच्या स्पर्धेत त्यांनी सुवर्ण पदक पटकावले होते. भारत सरकारने त्यांना २००७ साली पद्मश्री पुरस्काराने सन्मानीत केले होते. पाच दिवसापुर्वीच त्यांच्या पत्नी निर्मल कौर मिल्खा सिंह यांचे ८५ व्या वर्षी निधन झाले होते.
महत्त्वाच्या बातम्या
- अजितदादा… हे वागणं बरे नव्हे… आरोग्य कर्मचाऱ्यांवर लाठीचार्ज होणे हे संतापजनक आहे
- बीडमध्ये सध्या आंदोलनाचे वारे; आता २१ जूनला ‘रास्ता रोको’
- ‘१२ वी नापास पण टीका करण्यात अव्वल’ ; केआरकेने पुन्हा एकदा साधला कंगनावर निशाणा
- पहिल्या दिवशी वरुणदेवाने बॅटिंग केल्यामुळे खेळ वाया; दुसऱ्या दिवशीही पावसाची शक्यता
- ‘आम्ही एक महान खेळाडू गमावून बसलो’ ; मोदींनी व्यक्त केल्या भावना


