सिंधुदुर्ग : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे काल एक दिवसाच्या महाराष्ट्र दौऱ्यावर आलेले. सिंधुदुर्ग येथे खासदार नारायण राणे यांच्या ‘ड्रीम प्रोजेक्ट’ असलेल्या वैद्यकीय महाविद्यालयाचे अमित शाह यांच्या हस्ते उद्घाटन पार पडले..
कालच्या कार्यक्रमात बोलताना राणे यांनी यांनी शिवसेनेवर जोरदार टीका केली. ‘शिवसेना नेहमी चांगल्या कामाला विरोध करतेय. आधी कॉलेज मग एअरपोर्ट चांगल्या प्रोजेक्टला विरोध करायचा, नंतर उदघाटन वेळी यायचं, याला म्हणतात आयत्या बिळावर शिवसेना’, असे म्हणत नारायण राणे यांनी शिवसेनेवर तोफ डागली होती.
यावर शिवसेनेचे नेते वैभव नाईक यांनी भाष्य करत राणेंवर टीका केली आहे. ‘राज्यसभा खासदार नारायण राणे यांना शिवसेनेच्या विरोधात कोणीही किती ताकद दिली, तरी कोकणात राणेंना शिवसेना धूळ चारल्याशिवाय राहणार नाही’, असा निर्धार आमदार वैभव नाईक यांनी केला आहे.
दरम्यान, यावर नारायण राणेंचे पुत्र निलेश राणे यांनी वैभव नाईकांना प्रत्युत्तर दिलेय. ‘रिकामटेकडा आमदार वैभव नाईक स्वतःचा कार्यक्रम घेत नाही. पण जर कुठला कार्यक्रम घेतला तर त्याच्या कार्यक्रमाचे आमंत्रण कॅरम संघटनेचा अध्यक्ष सुद्धा स्वीकारणार नाही, म्हणून देशाचे गृहमंत्री राणे साहेबांच्या कार्यक्रमाला आल्यानंतर भिकारड्या शिवसैनिकांच्या पोटात दुखणारचं’, अस म्हणत वैभव नाईकांचा निलेश राणेंनी खरपूस समाचार घेतला आहे.
रिकामटेकडा आमदार वैभव नाईक स्वतःचा कार्यक्रम घेत नाही पण जर कुठला कार्यक्रम घेतला तर त्याच्या कार्यक्रमाचे आमंत्रण कॅरम संघटनेचा अध्यक्ष सुद्धा स्वीकारणार नाही म्हणून देशाचे गृहमंत्री राणे साहेबांच्या कार्यक्रमाला आल्यानंतर भिकारड्या शिवसैनिकांच्या पोटात दुखणारचं.
— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) February 8, 2021
महत्वाच्या बातम्या
- पिंपरी-चिंचवडमध्ये नाराज भाजप नगरसेवक अजितदादांच्या भेटीला; राजकीय भूकंपाची शक्यता !
- ‘सेलिब्रिटींना शेतीतलं काय कळत?’ : नवाब मलिक
- कारवाईसाठी गेलेल्या मनपाच्या स्वच्छता निरीक्षकाला दुध डेअरी चालकाची शिवीगाळ,गुन्हा दाखल
- प्रदेशाध्यक्ष होताच नाना पटोलेंना मोठा धक्का, कॉंग्रेसच्या बड्या नेत्याने सोपवला राजीनामा !
- अहमदनगर जिल्हा बँक निवडणुकीत मोनिका राजळे बिनविरोध
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

